India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अहमदनगर शहर व जिल्ह्यात ११ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी; हे करता येणार नाही

India Darpan by India Darpan
April 1, 2023
in राज्य
0

 

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात २९ मार्च ते ११ एप्रिल २०२३ या कालावधीत सण, उत्सव, जयंती, साजरे होणार आहेत. पोलीस भरती परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या आदेशानुसार वरील कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

अहमदनगर शहर व संपूर्ण जिल्ह्याहद्दीत सण व उत्सवा, सभा, आंदोलने त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही किरकोळ घटना वरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण अहमदनगर शहर व जिल्ह्यात २९ मार्च ते ११ एप्रिल २०२३ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश असताना शस्त्रे, काठया, सोटे तलवारी भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठ्या किंवा शारिरीक इजा करणेसाठी वापरता येईल. अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे, कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

या आदेशा मध्ये शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींसाठी हे आदेश लागू राहणार नाहीत. असे ही जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी प्रतिबंधात्मक आदेशात नमूद केलं आहे.

Ahmednagar Collector Restrictions Order upto 11 April


Previous Post

यंदा सोन्याने किती परतावा दिला? भाव कुठपर्यंत जाणार? गुंतवणूक करावी की नाही?

Next Post

टेन्शन घेऊ नका! सुरू करा मध उद्योग… मिळेल मोफत प्रशिक्षण आणि अर्थसहाय्यही… असा घ्या लाभ

Next Post
प्रातिनिधीक फोटो

टेन्शन घेऊ नका! सुरू करा मध उद्योग... मिळेल मोफत प्रशिक्षण आणि अर्थसहाय्यही... असा घ्या लाभ

ताज्या बातम्या

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023

धक्कादायक! इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला… खलिस्तानी समर्थकांचे कॅनडात कृत्य… सर्वत्र संताप

June 9, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा तीन दिवसांच्या रजेवर; आता कुठे गेले?

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group