India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

यंदा सोन्याने किती परतावा दिला? भाव कुठपर्यंत जाणार? गुंतवणूक करावी की नाही?

India Darpan by India Darpan
April 1, 2023
in राष्ट्रीय
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोन्याच्या किंमतीने वर्ष २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच एमसीएक्सवर अनुक्रमे जवळपास ७.५ टक्के आणि ८ टक्के परतावा दिला आहे. रशिया-युक्रेन युद्ध, यूएस व युरोपियन बाजारपेठेतील मंदीचे वातावरण व जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी, वाढत्या व्याजदरातील अस्थिरता, यूएस आर्थिक स्थितीत घट असे घटक सोन्याची किंमतीत वाढ होण्यास कारणीभूत असल्याचे एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

श्री माल्या यांनी पुढे सांगितले की, डॉलरची वाटचाल वस्तूंची दिशा ठरवण्यामध्ये लक्षणीय भूमिका बजावते. २८ मार्च २०२३ पर्यंत डॉलर निर्देशांक १.१३ टक्क्यांनी घसरला आहे, तर सोन्याच्या किंमती ८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तुलनेत २०२२ मध्ये डॉलर निर्देशांक ८ टक्क्यांनी वाढला आणि सोन्यामधून स्थिर परतावा मिळाला नाही. २०२३ मध्ये डॉलरचा निर्देशांक कसा पुढे जाईल यात महत्त्वाची भूमिका बजावणारी पुढील व्याजदर वाढ आणि इतर आर्थिक डेटा सेटमध्ये यूएस फेडच्या भूमिकेद्वारे डॉलरची दिशा निर्धारित केली जाईल.

गुंतवणूकदारांसाठी संचयित झोन १८०० डॉलर्स आहे, जेथे सर्वाधिक रेलचेल आहे आणि २०२३ मध्ये लक्ष्य मूल्य प्रति औंस २२०० डॉलर्स असेल. दुसरीकडे भारतातील गुंतवणूकदारांसाठी संचयित झोन जवळपास प्रति १० ग्रॅम ५५००० रूपये असेल आणि २०२३ च्या अखेरपर्यंत लक्ष्य प्रति ग्रॅम ६२००० रूपये असेल असे त्यांनी नमूद केले.

२०२३ मध्ये सोन्यासाठी स्थिती अनुकूल आहे का?
महागाईचा भार कमी करण्यासाठी यूएस फेडने संपूर्ण २०२२ मध्ये अग्रेसर पाऊल उचलले आहे आणि २०२३ मध्ये व्याजदरांमध्ये वाढ सुरू ठेवली आहे. फेड दरांमध्ये वाढ कितपत चालू ठेवेल याबाबत माहिती नसले तरी सुरक्षित मालमत्तेमध्ये, विशेषत: सोन्यामध्ये जागतिक गुंतवणूकदारांची रूची लक्षणीयरित्या वाढली आहे. तसेच यूएसमधील बँकिंग संकटामुळे (सिलिकॉन व्‍हॅली बँक, सिग्‍नेचर बँक आणि क्रेडिट सईसमध्ये घट) अलिकडील आठवड्यांमध्ये गुंतवणूकदारांची सुरक्षित आश्रयस्थानाप्रती रूची वाढली आहे.

सोने हा मालमत्ता वर्ग आहे, ज्याकडे सुरक्षित-आश्रयस्थान म्हणून पाहिले जाते, जेथे आर्थिक यंत्रणेमध्ये स्थिती काहीशी अवघड झाली की पैसा येऊ लागतो. तसेच, २०२२ मध्ये विक्रमी प्रमाणात सोने खरेदी करण्यासाठी सेंट्रल बँकांनी घाई केल्याने जागतिक गुंतवणूकदारांचा या मालमत्ता वर्गावर विश्वास वाढला. २०२२ हे ११३६ टनांच्या एकूण सोने खरेदीसह सेंट्रल बँकेसाठी विक्रमी वर्ष ठरले.

२०२३ मध्ये सोने कुठे जाईल?
अनपेक्षित आर्थिक मंदीचा यूएसमधील प्रबळ अर्थव्यवस्थेला फटका बसला नाही आणि मागणीची पूर्तता करण्यासाठी, तसेच महागाईच्या दबावावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक प्रबळ योजनांची गरज आहे. यूएस डॉलरची क्षमता व कमकुवतपणा पुढे वाटचाल करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामधून २०२३च्या उर्वरित महिन्यांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये होणारे बदल निर्धारित होईल.

व्यापक भौगोलिक-राजकीय जोखीम, विकसित बाजारपेठेतील आर्थिक मंदी, व्याजदरातील सर्वोच्च वाढ व अमेरिकन डॉलरमधील संभाव्य कमकुवतपणा, बँक संकटामुळे इक्विटी मूल्यांकनास जोखीम आणि शेवटचे, पण महत्त्वाचे म्हणजे सोने खरेदी करणारी सेंट्रल बँक या सर्वांमधून सोने २०२३ मध्ये बजावणाऱ्या कामगिरीची खात्री मिळेल. भारतातील गुंतवणूकदारांसाठी संचयित झोन जवळपास प्रति १० ग्रॅम ५५००० रूपये असेल आणि २०२३ च्या अखेरपर्यंत लक्ष्य प्रति ग्रॅम ६२००० रूपये असेल.

Gold Investment Return Experts Finance


Previous Post

वकील महिलेवर मांत्रिकाचा पती समोरच बलात्कार

Next Post

अहमदनगर शहर व जिल्ह्यात ११ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी; हे करता येणार नाही

Next Post

अहमदनगर शहर व जिल्ह्यात ११ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी; हे करता येणार नाही

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group