बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अमित शहा परतताच मध्यरात्री शिंदे आणि फडणवीसांची गुप्त बैठक; तब्बल ३ तास खलबतं, काय झाली चर्चा?

by Gautam Sancheti
सप्टेंबर 6, 2022 | 11:01 am
in मुख्य बातमी
0
eknath shinde devendra fadanvis e1657195561981

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईहून दिल्लीकडे जाताच मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खलबतं झाली आहेत. रात्रीच्या सुमारास या दोन्ही नेत्यांची तब्बल ३ तास बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा आणि निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीचा मुख्य अजेंडा मुंबईसह राज्यातील आगामी महापालिका निवडणुका हा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी मिशन मुंबई १५० चे लक्ष्य भाजपला दिले आहे.  मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी युद्ध पातळीवर कामाला लागण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत घेत कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेवर भाजपची सत्ता स्थापन करायचीच असा चंग बांधण्यात आला आहे. त्यासाठीच आता गुप्त बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तब्बल ३ तास चर्चा झाली. रात्री उशिरा ही बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या मुंबई महापालिकेच्या मिशन १५० च्या अनुषंगाने ही बैठक झाली असावी, असा अंदाज वर्तवला जातो असून या बैठकीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गट यांच्यात समन्वय कसा साधता जातो, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.

मुंबई मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेमकी काय चर्चा झाली, यावरुन आता तर्कवितर्कांना उधाण आले असून शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपने शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये मुंबई मनपावर भाजपची सत्ता आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे. मागील 2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने मोठी झेप घेतली होती. शिवसेना व भाजपमध्ये अवघ्या काही जागांचा फरक होता. शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्यानंतर मुंबई महापालिका निवडणूक सोपी करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीत अमित शाह हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्याची शक्यता आहे. शिंदे गट व भाजप ही निवडणूक एकत्रपणे लढवणार आहेत. तर, दुसऱ्या बाजूला शिवसेना महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार की राष्ट्रवादीसोबत आघाडी करून निवडणूक लढणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही.

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर लगेचच ही शिंदे-फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यामुळे देखील या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शाह यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘शिवसेनेने आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. राजकारणामध्ये धोका सहन करू नका. जे राजकारणात धोका देत असतात त्यांचे राजकारण यशस्वी होत नसते. त्यांना धडा शिकवला पाहिजे’ असं म्हणत अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजप पूर्ण ताकदीने आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जाईल, असे स्पष्ट मिळत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाची भूमिका नेमकी कशी असणार आहे, हे लवकरच ठरणार आहे. शिवसेनेला अखेरचा दणका देण्यासाठी आगामी महापालिका निवडणूक जिंकण्याचा चंगच भाजपने बांधला आहे. पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत भाजप नेते आशिष शेलार यांनी, मुंबईचा पुढील महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास व्यक्त केला होता.

देशात अनेक ठिकाणी यापुर्वी जवळपास अस्तित्व नसताना भाजपने ताकद पणाला लावून दुसरा मोठा पक्ष होण्यापर्यंत मजल मारली. मुंबईत तर आधीपासूनच भाजपचे अस्तित्व आहे. गेल्या निवडणुकीत तर भाजपने जवळपास शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळवत मोठी मजलही मारली आहे. त्यामुळे या वेळेस भाजपला सत्तेसाठी केवळ अखेरचा घाव घालायचा आहे असे भाजप नेत्यांचे मत आहे. त्यामुळेच शहा यांचा मुंबई दौरा हा अतिशय महत्वाचा समजला जात होता. २२७ जागा असलेल्या मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. सध्या महापालिकेवर प्रशासक राज आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४, भाजपचे ८२, काँग्रेसचे ३१, राष्ट्रवादीचे ९ तर एमआयएमचे २ नगरसेवक निवडून आले होते. विशेष म्हणजे दहा वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेत भाजपचे केवळ ३१ नगरसेवक होते. म्हणजेच २०१७ मध्ये भाजपने थेट ८२ जागांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळेच महापालिकेवर आपला झेंडा फडकावण्याच्या दृष्टीने सध्या तरी भाजपसाठी कंबर कसली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या गुप्त बैठकीनंतर भाजपकडून आता कोणता डाव टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

After Amit Shah Tour Midnight Meet Between Eknath Shinde And Devendra Fadanvis
Politics Strategy BMC Elections Local Body BJP

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

७२ तासांत ५२ बालकांवर यशस्वी हृदय उपचार; पहिल्यांदाच शिरपूर-धुळे-धामणगाव कॉरिडोर; १५०हून जास्त रुग्ण व नातलगांना घेऊन धावली वाहनं

Next Post

बंगळुरूत पावसाचा हाहाकार… सगळीकडे पाणीच पाणी… विद्यार्थ्यांची चक्क JCBतून वाहतूक… बघा व्हायरल व्हिडिओ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Girish Bapat
संमिश्र वार्ता

‘हो, मी नाराज आहे’, खासदार गिरीश बापट असे का म्हणाले?

सप्टेंबर 7, 2022
Marathwada
राज्य

मराठवाडा मुक्ती गाथा: रुई-रामेश्वरला पेशवे – निजाम भेटी मागची कथा..!!

सप्टेंबर 7, 2022
Eknath Shinde Raj Thackeray
महत्त्वाच्या बातम्या

दसरा मेळाव्याला राज ठाकरेंची उपस्थिती? एकनाथ शिंदेंनी म्हणाले…

सप्टेंबर 6, 2022
Devendra Fadanvis
महत्त्वाच्या बातम्या

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत फडणवीस यांनी केली ही मोठी घोषणा

सप्टेंबर 6, 2022
aditya thackeray 2 e1658480643618
संमिश्र वार्ता

दसरा मेळावा कुठे होणार? आदित्य ठाकरे म्हणाले….

सप्टेंबर 6, 2022
Next Post
Fb5DSnHUEAAERNi

बंगळुरूत पावसाचा हाहाकार... सगळीकडे पाणीच पाणी... विद्यार्थ्यांची चक्क JCBतून वाहतूक... बघा व्हायरल व्हिडिओ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011