India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेत्री श्रद्धा कपूरने मारला मराठमोळ्या मिसळ पाववर ताव

India Darpan by India Darpan
January 15, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय खाद्यसंस्कृतीत अनेक खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. त्यामुळेच आपल्या या पदार्थांचे अनेक चाहते आहेत. अगदी परदेशातील लोकांना देखील याची भूल पडली आहे. मग आपल्याकडील लोकांना याची भुरळ पडली नाही तरच नवल.

मराठीचा महिमा सातासमुद्रापार पोहचला आहे. अस्सल महाराष्ट्रीयन संस्कृती, पदार्थ आणि आता सिनेमा यांनी सर्वाना वेड लावले आहे. यापासून बॉलीवूड लांब कसं राहू शकेल. ‘स्त्री’ चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर अस्सल महाराष्ट्रीयन आहे. तिची आई मराठी असून वडील पंजाबी आहेत, मात्र घरात ती अस्खलित मराठीत बोलते. त्यामुळे श्रद्धाने मिसळ पाववर ताव मारत मिसळ पावची वाहवा केली आहे.

मुंबईच्या वडापावप्रमाणे मिसळपाव देखील प्रसिद्ध आहे. मात्र कोल्हापूर, नाशिक, ठाणे, पुणे कुठली मिसळ सर्वात उत्तम असा एका सध्या वाद सुरू झाला आहे. अभिषेक बच्चनला देखील ठाण्यातील मामलेदार मिसळ आवडते. तर श्रद्धा कपूरनेदेखील मिसळ पावचा आनंद लुटत फोटो शेअर केला आहे, यात ती मिसळ पाव खात आहे, ‘wow मिसळ पाव’ अशी कॅप्शनही तिने दिली आहे. श्रद्धा कपूर मराठी सण साजरे करत असते, अनेकदा पत्रकार परिषदेतही ती मराठीत संवाद साधत असते.

श्रद्धा कपूर ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते. ‘भेडिया’ चित्रपटातील ‘ठुमकेश्वरी’ या गाण्यात नुकतीच श्रद्धा कपूरची झलक दिसली होती. लवकरच ती आता ‘लव रंजन’ यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. तिच्याबरोबर या चित्रपटात रणबीर कपूरदेखील असणार आहे.

Actress Shraddha Kapoor Tasty Misal Pav Video


Previous Post

…या व्हिडिओमुळे अभिनेत्री प्रार्थना बेहरे ट्रोल

Next Post

एकता कपूर तर उर्फी जावेदची गुरू; नव्या ड्रेसमध्ये खुपच अवघडली (बघा हा व्हिडिओ)

Next Post

एकता कपूर तर उर्फी जावेदची गुरू; नव्या ड्रेसमध्ये खुपच अवघडली (बघा हा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Good News! डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आता या सरकारी योजनेचा लाभ

February 1, 2023

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group