India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

एकता कपूर तर उर्फी जावेदची गुरू; नव्या ड्रेसमध्ये खुपच अवघडली (बघा हा व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
January 15, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – डेली सोपच्या दुनियेत एकता कपूर हे खूप मोठे नाव आहे. ती अभिनेते जितेंद्र यांची मुलगी असून आपल्या बालाजी टेलिफिल्म मधून मालिका निर्मिती करते. एकता कपूर ही नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे कायम चर्चेत असते. अनेकदा तिला तिच्या कलाकृतींमुळे ट्रोल करण्यात येतं. नुकतंच एका कलाकाराला घरी पाठवल्यामुळे ती चर्चेत होती. सध्या ती तिच्या बोल्ड वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. आता तिला तिच्या फॅशन सेन्समुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

फॅशन सेन्समुळे ट्रोल होण्यावरून अनेकांना प्रश्न पडला असेल. पण, हे खरं आहे. एकता कपूरचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. अलीकडेच एकता कपूर रिद्धी डोग्राला तिच्या नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देण्यासाठी आली होती. यादरम्यान ती काळ्या रंगाच्या सॅटिन ड्रेसमध्ये दिसली. एकताचा एकंदरीत लूक खूपच ग्लॅमरस होता. मात्र कारमधून उतरल्यानंतर एकता कपूर तिचा ड्रेस वारंवार नीट करताना दिसली. पण, या ड्रेसमध्ये ती बऱ्यापैकी अन्कम्फर्टेबल दिसते आहे. ती सारखा ड्रेस नीट करत असल्याने हा अवघडलेपणा स्पष्ट दिसत होता. नेटकऱ्यांनी नेमकी तिची हीच गोष्ट हेरली आणि तिला ट्रोल केले.

एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तुम्हाला कपडे कसे घालावेत हेही कळत नसेल तर तुमच्याकडे असलेल्या एवढ्या पैशांचा उपयोग काय!” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “माझी सॅटिनची बेडशीट चोरीला गेली, तिला सांगा परत द्यायला.” तर तिसर्‍याने लिहिलं, “आम्ही सुशांत सिंह राजपूतच्या नावाने कपडे दान करू, कृपया आम्हाला एकताचा पत्ता पाठवा, आम्ही तिलाही कपडे दान करू.” याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “उर्फी विनाकारण बदनाम आहे, एकता तर उर्फी जावेदची गुरु आहे.” तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे तिच्यावर सर्वत्र टीका होऊ लागली आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Ekta Kapoor Troll on Dress Fashion Show Video


Previous Post

अभिनेत्री श्रद्धा कपूरने मारला मराठमोळ्या मिसळ पाववर ताव

Next Post

धक्कादायक! चीनमध्ये महिन्याभरात तब्बल इतक्या नागरिकांचा मृत्यू; असे झाले उघड

Next Post

धक्कादायक! चीनमध्ये महिन्याभरात तब्बल इतक्या नागरिकांचा मृत्यू; असे झाले उघड

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023

ही पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय; युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी

February 1, 2023

माढा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक निर्णय

February 1, 2023
प्रातिनिधीक फोटो

‘सीडीएस’ परीक्षा पूर्व तयारीसाठी इच्छुक उमेदवारांना आवाहन

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group