India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी सांगितले त्यांच्या प्रेमकहाणीतील अनेक किस्से

India Darpan by India Darpan
March 7, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिंदी चित्रपटसृष्टीतील जुन्या काळातील अनेक अभिनेत्री आजही चर्चेत असतात. त्यांचा अभिनय हे तर मोठे कारण आहेच पण त्यांचे सोज्ज्वळ सौंदर्य हा देखील त्या लक्षात राहण्याचा महत्त्वाचा भाग आहे. जुन्या काळातील अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर – पतौडी यांचा एक चित्रपट नुकताच डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. त्यानिमित्ताने त्या अनेक ठिकाणी दिसत आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर गेले काही दिवस खूपच चर्चेत आहेत. ‘गुलमोहर’ चित्रपटाच्या निमित्ताने त्या अनेक मुलाखती देत आहे. त्यांची नात सारा अली खान हिच्यासोबत त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक अनप्लॅन्ड ट्रिपची आठवण सांगितली.

शर्मिला टागोर यांचा ‘गुलमोहर’ चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. तर त्यांची नात अभिनेत्री सारा अली खानचा ‘गॅसलाइट’ सिनेमा ३१ मार्च रोजी याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याच निमित्ताने आजी-नातीच्या जोडीला एकत्र बोलवण्यात आलं होतं.

“प्रेमामध्ये तुम्ही केलेला सर्वात मोठा वेडेपणा कोणता?” असा प्रश्न यावेळी शर्मिला यांना विचारण्यात आला. तेव्हा शर्मिला म्हणाल्या की, “अनेक वर्षांपूर्वी मी पनवेलमध्ये एका चित्रपटाचं शूटिंग करत होते. एक दिवस काही कारणाने माझं पॅकअप लवकर झालं. नेमकं तेव्हाच माझे पती मन्सूर अली खान पतौडी हे बाहेरगावी जाणार होते. पॅक अप लवकर झाल्याने माझ्या डोक्यात त्यांना विमानतळावर भेटायला जाण्याचा विचार आला. मी त्यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर पोहोचले तेव्हा ते मला म्हणाले की, तूही माझ्याबरोबर चल. मी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्याबरोबर येण्यासाठी त्यांना होकार दिला.”

मी हो म्हटलं खरं, पण तेव्हा माझ्याकडे माझे कपडे, मेकअपचं सामान, इतकंच नव्हे तर साधा टूथब्रशही नव्हता. मी सामान न घेताच ती फ्लाईट पकडली होती. पण या अचानक ठरवलेल्या ट्रिपमध्ये मला खूप मजा येऊ लागली. तेव्हा मला माझ्या पतीचे शॉर्ट्स आणि दुसऱ्या एका व्यक्तीचा शर्ट परिधान करावा लागल्याची आठवणही त्यांनी सांगितली. आजीचं हे बोलणं ऐकून सारा देखील आश्चर्यचकित झाली. तिने देखील हा किस्सा पहिल्यांदाच ऐकला. सध्या त्यांची ही मुलाखत खूप चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

Actress Sharmila Tagore Love Story Incidences


Previous Post

मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय; शरणपूररोडवर पोलिसांनी केला भांडाफोड

Next Post

अभिनेत्री अनिकाला बॉयफ्रेंडकडून जबर मारहाण; तिनेच शेअर केले फोटो

Next Post

अभिनेत्री अनिकाला बॉयफ्रेंडकडून जबर मारहाण; तिनेच शेअर केले फोटो

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group