India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेत्री हंसिका मोटवानीने लग्नास होकार द्यायला लावली एवढी वर्ष; पण का? म्हणाली…

India Darpan by India Darpan
February 22, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांचे कौटुंबिक आयुष्य कायमच चर्चेत असते. त्यांचे हे कौटुंबिक आयुष्य खासगी राहीलच याची काही खात्री नसते. कारण, कलाकारांच्या चाहत्यांना त्यांच्या खासगी आयुष्यातही फार रस असतो. सध्या या क्षेत्रातील कलाकार बोहल्यावर चढण्याचे प्रमाण वाढले आहे. अभिनेत्री हंसिका मोटवानीने देखील डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली. नुकतेच एका मुलाखतीत तिने खासगी आयुष्यावर भाष्य केले आहे.

हंसिका मोटवानी सध्या MY3 नावाच्या वेबसीरिजवर काम करत आहे. अभिनेत्री हंसिकाने बालकलाकार म्हणून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं आणि तिला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटात ती झळकली होती. त्यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आप का सुरूर’मध्ये तिला पाहून प्रेक्षक आश्चर्यचकीत झाले. ४ डिसेंबर रोजी हंसिकाने बॉयफ्रेंड सोहेल खातुरियाशी लग्नगाठ बांधली.

राजस्थानमधील जयपूर शहरातील एका किल्यात हंसिकाचा शाही विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत ती सांगते की, “या लग्नाला होकार द्यायला मला किमान ७ ते ८ वर्ष लागली. माझा प्रेमावर विश्वास आहे. पण मला कोणत्याही भावना दाखवता येत नाहीत. तरीही विवाह संस्था आणि आणि लग्नावर माझा विश्वास आहे.” तरीही मी लग्नाला होकार द्यायला वेळ लावला कारण जेव्हा एखादी व्यक्ती माझी होईल अशी खात्री मला वाटते, तेव्हाच मी होकार दिला. सोहेल आला आणि प्रेमावरचा माझा विश्वास त्याने सार्थ ठरवला, असेही हंसिका म्हणाली.

सोहेलने २ नोव्हेंबर रोजी आयफेल टॉवरसमोर गुडघ्यावर बसून हंसिकाला प्रपोज केलं होतं. हंसिकाने तिच्या इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर करत तिच्या साखरपुड्याची माहिती दिली होती. माध्यमांमधील रिपोर्ट्सनुसार, सोहेल हा मुंबईचा असून तो उद्योजक आहे. हंसिका आणि सोहेल खातुरिया अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

Lots of Love, Lots of Happiness and a bit of Drama… #HotstarSpecials #HansikasLoveShaadiDrama Streams from 10th Feb only on @disneyplushotstar@ihansika @Avinaash_Offi #Uttam_Domale @nowme_datta @sajeed_a @ajaym7  #Hansika #HansikaMotwani pic.twitter.com/tdPGcYhkr3

— Hansika (@ihansika) January 30, 2023

Actress Hansika Motwani on Marriage Proposal


Previous Post

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता तुम्हाला मिळेल अतिरिक्त पेन्शन; असा आहे त्याचा फायदा

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group