India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता तुम्हाला मिळेल अतिरिक्त पेन्शन; असा आहे त्याचा फायदा

India Darpan by India Darpan
February 22, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भविष्य निर्वाह निधीमध्ये एकूण योगदानाच्या ८.३३ टक्के अतिरिक्त रक्कम देऊन अतिरिक्त पेन्शन मिळविण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाला आहे. मात्र, हा नवीन पर्याय स्वीकारायचा की नाही यासंदर्भात पंधरा दिवसांत कर्मचाऱ्यांना निर्णय घ्यायचा आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ४ महिन्यांची मुदत संपण्यास १५ दिवस शिल्लक असताना ईपीएफओने परिपत्रक काढून सूचना जारी केल्या आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (सुधारित) योजना २०१४ ग्राह्य ठरवली होती. ईपीएसमधील सुधारणेमुळे पेन्शनपात्र वेतनाची मर्यादा प्रतिमाह ६,५०० रुपयांवरून १५,००० रुपये अशी वाढवण्यात आली आहे, तसेच या मर्यादेपेक्षा वेतन अधिक असल्यास सदस्यांना त्यांच्या नियोक्त्याबरोबर प्रत्यक्ष वेतनाच्या ८.३३ टक्के रक्कम योगदान देण्याची परवानगी देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०१४ आणि त्यानंतर सदस्य झालेले कर्मचारी आणि त्यांच्या नियोक्त्यांना अधिक पेन्शनसाठी संयुक्तरीत्या अर्ज करावा लागणार आहे.

१४.९३ लाख सदस्य
डिसेंबर २०२२मध्ये भविष्य निर्वाह निधीमध्ये १४ लाख ९३ हजार नवे सदस्य झाले आहेत. गतवर्षी याच महिन्यातील सदस्यवाढीपेक्षा हा आकडा ३२ हजार ६३५ने (२ टक्के) जास्त आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ईएसआयसी) डिसेंबर २०२२मध्ये १८.०३ लाख कर्मचारी नव्याने दाखल झाल्याचे केंद्रीय श्रम मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.

अशी असेल प्रक्रिया
वाढीव पेन्शनकरिता अर्ज करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. संबंधित यूआरएलमध्ये आवश्यक बदल लवकरच केले जातील, असे ईपीएफओकडून सांगण्यात आले आहे. अर्ज नोंदवून डिजिटली नोंद (लॉग) केल्यानंतर अर्जदाराला पावती क्रमांक दिला जाईल. यासंबंधीचे निर्णय संबंधित विभागीय अधिकाऱ्याकडून घेतले जातील आणि अर्जदाराला ईमेल आणि एसएमएसद्वारे त्याची माहिती दिली जाईल. ज्या कर्मचाऱ्यांनी आधीच उच्च वेतनासाठी योगदान दिले आहे, पण औपचारिकता पूर्ण केलेली नाही त्यांना आता ईपीएफओ प्रादेशिक कार्यालयामध्ये अर्ज करावा लागेल.

EPFO Additional Pension Option Open Benefits


Previous Post

राज्यात या ४ ठिकाणी सुरू होणार रो-रो सेवा; असा होणार फायदा

Next Post

अभिनेत्री हंसिका मोटवानीने लग्नास होकार द्यायला लावली एवढी वर्ष; पण का? म्हणाली…

Next Post

अभिनेत्री हंसिका मोटवानीने लग्नास होकार द्यायला लावली एवढी वर्ष; पण का? म्हणाली...

ताज्या बातम्या

चित्रपट शुटींगवेळी अभिनेता अक्षय कुमार जखमी

March 24, 2023

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; आता हा सुद्धा गुन्हा मानला जाणार

March 24, 2023

येत्या १ एप्रिलपासून बदलणार हे सर्व नियम… आजच घ्या जाणून… अन्यथा…

March 24, 2023

करौली बाबाच्या अनेक बाबी उघड… दररोज करोडोंची उलाढाल.. आश्रमात आहेत या शाही सुविधा… अॅम्ब्युलन्सचा यासाठी होतो वापर…

March 24, 2023

पुणेरी जाऊ द्या… आता या सोलापुरी बॅनरची जोरदार चर्चा… असं काय आहे त्यात? तुम्हीच बघा

March 24, 2023

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी… येथे निघाल्या तब्बल ५३६९ जागा… येथे आणि असा करा अर्ज

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group