इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांचे कौटुंबिक आयुष्य कायमच चर्चेत असते. त्यांचे हे कौटुंबिक आयुष्य खासगी राहीलच याची काही खात्री नसते. कारण, कलाकारांच्या चाहत्यांना त्यांच्या खासगी आयुष्यातही फार रस असतो. सध्या या क्षेत्रातील कलाकार बोहल्यावर चढण्याचे प्रमाण वाढले आहे. अभिनेत्री हंसिका मोटवानीने देखील डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली. नुकतेच एका मुलाखतीत तिने खासगी आयुष्यावर भाष्य केले आहे.
हंसिका मोटवानी सध्या MY3 नावाच्या वेबसीरिजवर काम करत आहे. अभिनेत्री हंसिकाने बालकलाकार म्हणून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं आणि तिला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटात ती झळकली होती. त्यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आप का सुरूर’मध्ये तिला पाहून प्रेक्षक आश्चर्यचकीत झाले. ४ डिसेंबर रोजी हंसिकाने बॉयफ्रेंड सोहेल खातुरियाशी लग्नगाठ बांधली.
राजस्थानमधील जयपूर शहरातील एका किल्यात हंसिकाचा शाही विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत ती सांगते की, “या लग्नाला होकार द्यायला मला किमान ७ ते ८ वर्ष लागली. माझा प्रेमावर विश्वास आहे. पण मला कोणत्याही भावना दाखवता येत नाहीत. तरीही विवाह संस्था आणि आणि लग्नावर माझा विश्वास आहे.” तरीही मी लग्नाला होकार द्यायला वेळ लावला कारण जेव्हा एखादी व्यक्ती माझी होईल अशी खात्री मला वाटते, तेव्हाच मी होकार दिला. सोहेल आला आणि प्रेमावरचा माझा विश्वास त्याने सार्थ ठरवला, असेही हंसिका म्हणाली.
सोहेलने २ नोव्हेंबर रोजी आयफेल टॉवरसमोर गुडघ्यावर बसून हंसिकाला प्रपोज केलं होतं. हंसिकाने तिच्या इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर करत तिच्या साखरपुड्याची माहिती दिली होती. माध्यमांमधील रिपोर्ट्सनुसार, सोहेल हा मुंबईचा असून तो उद्योजक आहे. हंसिका आणि सोहेल खातुरिया अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.
https://twitter.com/ihansika/status/1620042047318269954?s=20
Actress Hansika Motwani on Marriage Proposal