रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘सलमान खानने मला सिगारेटचे चटके देऊन मारहाण केली’, माजी गर्लफ्रेंड सोमी अलीचे धक्कादायक आरोप

डिसेंबर 5, 2022 | 5:06 am
in मनोरंजन
0
Somy Ali scaled e1660892967527

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चित्रपटसृष्टीतील कलाकार काही न काही कारणाने सातत्याने चर्चेत असतात. मात्र, यात त्यांच्याबद्दलच्या चांगल्या गोष्टी कमी आणि इतर गोष्टीच जास्त ऐकू येत असतात. अशा प्रकारचं गॉसिप हे काही या कलाकारांसाठी नवीन नाही. बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्यावर त्याच्याच जुन्या प्रेयसीने गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळेच पुन्हा एकदा हा अभिनेता आणि त्याची जुनी प्रेयसी चर्चेत आले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री सोमी अली हिने पुन्हा एकदा बॉलिवूडचा ‘दबंग’ खान सलमान खानवर आरोप केले आहेत. सोमीने सलमानसोबतचा जुना फोटो शेअर करत त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला. गंमत म्हणजे, या आरोपांनंतर काही वेळाने तिने ही पोस्ट डिलिट केली. सोमी ही सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड होती असं म्हटलं जातं. या दोघांचं नातं काही फार काळ टिकू शकलं नाही. मात्र त्यांच्या अफेअरच्या चर्चा आजही रंगतात. याआधीही सोमीने सलमानवर गंभीर आरोप केले होते.

सलमान खानवर आरोप करताना सोमीने एक जुना फोटो पोस्ट केला. यामध्ये सलमान तिला गुलाबाचं फूल देताना दिसतोय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘आता बरंच काही घडणार आहे. भारतात माझा शो बंद करण्यात आला आणि मला धमकावलं. तू भित्रा आहेस. इथे माझ्या सुरक्षेसाठी ५० वकील उभे आहेत, जे मला सिगारेटच्या चटक्यांपासून आणि शारीरिक शोषणापासून वाचवतील. जे तू माझ्यासोबत बरीच वर्षे करत होतास. जे महिलांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीची साथ देतात, त्या सर्व अभिनेत्रींना लाज वाटली पाहिजे. तसेच, जे त्याची साथ देतात, अशा अभिनेत्यांनाही लाज वाटली पाहिजे. आता लढण्याची वेळ आली आहे’, अशी धक्कादायक पोस्ट तिने केली आहे. सोमी अलीची ही पोस्ट सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाली. काही वेळाने मात्र तिने ही पोस्ट डिलिट केली. सोमीने ही पोस्ट डिलिट का केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र तिच्या या पोस्टमुळे बॉलिवूड आणि सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे.

सोमी आणि सलमान खान जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा सलमानची ऐश्वर्यासोबतची जवळीक वाढली होती. सलमान त्यावेळी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. त्यानंतर ऐश्वर्यानेही सलमानवर मारहाण आणि फोनवर धमकी दिल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानी वंशाच्या सोमी अलीने सांगितलं होतं की, ती फक्त सलमानसाठी भारतात आली होती. जेणेकरून नंतर ती सलमानसोबत लग्न करू शकेल. पण जवळपास ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांचं नातं तुटलं. १९९१ ते १९९७ दरम्यान, सोमी अलीने १० हून अधिक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केलं होतं. सध्या ती परदेशात एक एनजीओ चालवते.

Actor Salman Khan Ex Girlfriend Allegations

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्रीदत्त परिक्रमा भाग १९ : दत्तबावनी लिहिणाऱ्या रंगावधूत महाराजांची कर्मभूमी श्रीक्षेत्र नारेश्वर

Next Post

येत्या ९ डिसेंबरपासून अंकुर फिल्म फेस्टिव्हल; हे आहे यंदाचे आकर्षण…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20221201 WA0040

येत्या ९ डिसेंबरपासून अंकुर फिल्म फेस्टिव्हल; हे आहे यंदाचे आकर्षण...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011