India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

श्रीदत्त परिक्रमा भाग १९ : दत्तबावनी लिहिणाऱ्या रंगावधूत महाराजांची कर्मभूमी श्रीक्षेत्र नारेश्वर

India Darpan by India Darpan
December 5, 2022
in साहित्य व संस्कृती
0

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्रीदत्त परिक्रमा
लेख-19
श्रीदत्त स्थान महिमा २५ वा
दत्तबावनी लिहिणारया रंगावधूत महाराजांची कर्मभूमी
||श्री क्षेत्र नारेश्वर||

दत्त संप्रदायात गुरुचरित्रांइतकेच महत्व ‘श्रीदत्तबावन्नी’ला आहे, दत्तबावनीवर अनेक भक्तांची श्रद्धा आहे. सुप्रसिद्ध दत्तभक्त प.पू. रंगावधुत महाराज यांनी गुरुचरित्राच्या ५२ श्लोकांवर आधारित अशी रचलेली ही दत्तबावनी अतिशय प्रसिद्ध आणि प्रभावी आहे. त्यांनी अनेक स्तोत्रे रचली असून सत्य दत्त पूजा व्रताचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आहे. रंगावधूत महाराजांना बापजी असेही म्हणत असत. नारेश्वर येथे मोठे मंदिर असून बापजींची समाधी, अवधूत मंदिर, अवधूत गुंफा, प्रार्थना मंदिर, बोधीवृक्ष-निंब, बापजींच्या पादुका आणि मातृमंदिर असा परिसर आहे.

विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

श्रीरंगावधूत महाराज कोण होते?
बडोद्यापासून ६० कि. मी. अंतरावर श्रीक्षेत्र नारेश्वर हे गुजरात राज्यातील एक महान दत्तक्षेत्र म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. दत्त संप्रदायातील एक थोर सत्पुरुष श्रीरंगावधूत महाराज यांनी तपश्चर्या केलेले हे ठिकाण आहे. तेथेच त्यांची समाधी आहे. गुजरात राज्यात त्यांनी श्रीदत्त संप्रदायाचा फार मोठय़ा प्रमाणावर प्रचार आणि प्रसार केला आहे.

गणपतीचे तपश्चर्या स्थान
नारेश्वराचे माहात्म्य फार प्राचीन आहे. फार वर्षांपूर्वी येथे कपर्दीश्वराचे मंदिर होते. नर्मदेच्या पुरामुळे ते मंदिर पडले व पिंड खाली जमिनीत गेली. असे मानले जाते की नारोशंकर नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात एकदा शंकराने येऊन सांगितले की, मी जमिनीत गाडला गेलो आहे. मला बाहेर काढून जीर्णोद्धार कर. त्याप्रमाणे नारो शंकरांनी ती पिंड बाहेर काढून त्याची प्रतिष्ठापना केली. येथे गणपतीने उग्र तपश्चर्या केली होती अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मुंगूस व मोर एकत्र
तेथे भयाण अरण्य होते. हिंस्र श्वापदांची तेथे वस्ती होती. दहा गावची ती स्मशानभूमी होती. दिवसासुद्धा तेथे कोणी येण्यास धजत नव्हता. एकांतस्थान असल्याने व वर्दळ नसल्याने अवधूतांनी ही जागा उपासनेसाठी पसंत केली. रात्री त्यांना शंखाचे आवाज-भजनाचे आवाज स्पष्टपणे ऐकू येत होते. शिवाय तेथे मुंगूस व मोर एकत्र खेळताना आढळले. वरील कारणांमुळे अवधूतांनी उपासनेसाठी ही जागा पसंत केली असावी अशी श्रद्धा आहे.

कडुलिंबाची पाने गोड
नर्मदाकाठ, गणेशाचे उपासनेसाठी वास्तव्य यामुळे पवित्र असे हे तीर्थक्षेत्र होतेच. त्यात पुन्हा अवधूतांच्या वास्तव्यामुळे ते तीर्थ जागृत असे तीर्थक्षेत्र झाले. नारेश्वर येथे एका कडुलिंबाच्या झाडाखाली अवधूतांनी खडतर तपश्चर्या केली. तो कडुलिंब नम्र होऊन त्याच्या फांद्यांची वाढ वर (उध्र्व) न होता खाली जमिनीकडे झाली. त्या फांद्या जमिनीस टेकल्या आहेत, असे मानले जाते. इतकेच नव्हे तर अवधूतांच्या तपश्चर्येमुळे त्या कडुलिंबाची पाने गोड झाली आहेत, असे संगितले जाते. रंगावधूत महाराजांचे पूर्वीचे नाव पांडुरंग विठ्ठल वळामे असे होते. त्यांचे वडील नोकरीनिमित्त गुजरातमध्ये गोधरा या ठिकाणी राहात होते. महाराजांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. एकदा वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा वाडी येथे मुक्काम होता.

गुरू-शिष्यांची एकमेव भेट
थोरले महाराज कृष्णेवर स्नान करून रस्त्याने जात असताना समोर बाळ पांडुरंग उभा होता. बाळाने त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. स्वामी म्हणाले, ‘‘बाळ तू कुणाचा?’’ बाळ म्हणाला, ‘‘तुमचाच.’’ स्वामींनी त्याला एक खडीसाखरेचा खडा प्रसाद म्हणून दिला. तो बाळाने खाल्ला. हीच गुरू-शिष्यांची पहिली व शेवटची भेट. पुढे लौकिकदृष्टय़ा पांडुरंगाची व स्वामींची भेट झाली नाही. ही भेट शेवटची ठरली. या भेटीत स्वामींनी बाळावर पूर्ण कृपा केली.

गुरुचरित्राच्या ५२ श्लोकांवर रचलेली दत्तबावनी
रंगावधूत महाराज नारेश्वर येथे अखेपर्यंत आपल्या आईसोबत राहिले. त्यांनी गुरुचरित्राच्या ५२ श्लोकांवर आधारित अशी रचलेली दत्तबावनी अतिशय प्रसिद्ध आहे. दत्तबावनीवर अनेक भक्तांची श्रद्धा आहे. त्यांनी अनेक स्तोत्रे रचली असून सत्य दत्त पूजा व्रताचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आहे. रंगावधूत महाराजांना बापजी असेही म्हणत असत. नारेश्वर येथे मोठे मंदिर असून बापजींची समाधी, अवधूत मंदिर, अवधूत गुंफा, प्रार्थना मंदिर, बोधीवृक्ष-निंब, बापजींच्या पादुका आणि मातृमंदिर असा परिसर आहे. येथे राहण्याची आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे.

श्रीदत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार
दत्त संप्रदायातील एक थोर सत्पुरुष श्रीरंगावधूत महाराज यांनी तपश्चर्या केलेले हे ठिकाण आहे. तेथेच त्यांची समाधी आहे. गुजरात राज्यात त्यांनी श्रीदत्त संप्रदायाचा फार मोठय़ा प्रमाणावर प्रचार आणि प्रसार केला आहे. श्रीरंग अवधूत स्वामी महाराजांचे परम पावन वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी. या जागेची पार्श्र्वभूमी मोठी अद्भूत आहे. श्रीरंग अवधूत स्वामी महाराज उपासनेसाठी हिमालयाच्या कुशीत जात असताना ‘मागे फिर, मागे फिर’ असे शब्द ऐकू आले. गुरूआज्ञाच समजून ते परतले. नर्मदा किनारी एकाने जागा सुचवली. त्यांचेबरोबर २-३ व्यक्ती होत्या. त्यांना सांगितले, आपण घरी जा मी येथेच मुक्काम करतो. उद्या आपण या मी आपणांस सांगेन. ते स्वामी तेथेच मुक्कामास राहिले ती जागा ८-१० गावांची स्मशानभूमी होती.

पिशाच्चांचे वास्तव्य, मोठमोठी झाडे सूर्यप्रकाशच भूमीवर पडत नसे. सहसा दिवसा सुद्धा येथे कोणी येण्यास धजत नसे. हिंस्त्र प्राणी, विंचू, इंगळ्या, मोर, सर्प इ. राजरोज फिरत असत. त्या बाजूस रात्री शंख फूंकण्याचे, डमरूचे आवाज ऐकले. साप-मुंगुस, मोर-साप यांच्यासारखी जन्म शत्रू प्राणी येथे प्रेमाने एकत्र असल्याचे त्या साधूने पाहिले. स्वामींनी निर्णय घेतला की येथेच तपाचरण करायचे. तेच हे श्री रंग अवधूत स्वामींचे नारेश्र्वर! नर्मदा किनारीचे पवित्र तीर्थक्षेत्र !

भक्तांसाठी अनेक सोई सुविधा
याठिकाणी श्रीरंग अवधूत स्वामींचा अवधूत निवास हा आश्रम आहे. प्रार्थना भवन, मातृकुटीर बोधी वृक्षासारखा लिंबाचा वृक्ष इ. स्थाने दर्शनीय आहेत. हा मंदीर परिसर अत्यंत स्वच्छ, देखणा व पवित्र आहे. या परिसरात भक्तनिवास, भोजनालय इ. सुविधा आहेत.
याठिकाणी रंगजयंती, दत्तजयंती इ. अनेक उत्सव साजरे केले जातात. अनेक धनाढ्य लोकांचा श्रीरंग अवधूत स्वामींवरील असणाऱ्या श्रद्धेने याठिकाणी अनेक भक्त देणग्या देतात. त्यातून भक्तांसाठी अनेक सोई सुविधा निर्माण केल्या आहेत. भारतातूनच नव्हे तर जगातील अनेक देशांतील भक्त येथे येऊन सेवा करतात. संस्थान सातत्याने धार्मिक बरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवते.
येथे भक्तनिवास निःशुल्क, नाममात्र शुल्काने उपलब्ध आहे. भक्तांसाठी भोजन प्रासाद येथे मोफत उपलब्ध आहे. या ठिकाणी स्वामी महाराजांनी स्वर्ग निर्माण केला आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे. येथे गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, श्रीरंग अवधूत स्वामी महाराजांचा स्मृतीदिन,

असे उत्सव साजरे होतात
बडोद्यापासून ६० कि. मी. अंतरावर श्रीक्षेत्र नारेश्वर हे गुजरात राज्यातील एक महान दत्तक्षेत्र म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. नारेश्वर जवळच वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे समाधी स्थळ गरुडेश्वर, त्यांनी चातुर्मास केलेले तिलकवाडा, श्रीक्षेत्र अनुसया आणि प्रतापे महाराज यांनी स्थापन केलेले भालोद ही महत्त्वाची दत्तस्थाने आहेत.
संपर्क: श्री अवधूत निवास ट्रस्ट, मु. नारेश्वर, पो. सयार व्हाया अंकलेश्वर जि. बडोदा गुजरात
भक्त निवास श्री योगेशभाई ०२६६६-२५३२९३ मोबाइल ०९८२४०४३४४

श्रीदत्त स्थान महिमा २६ वा – श्रीक्षेत्र तिलकवाडा
प.पू. वासुदेवानंद सरस्वती यांनी एक चातुर्मास केलेले स्थान.
प.पू. वासुदेवानंद सरस्वतींनी संन्यास ग्रहणानंतर त्यांनी काशीपासून रामेश्वरापर्यंत आणि द्वारकेपासून राजमहेंद्रीपर्यंत भारत-भ्रमण केले आणि शास्त्राचरणाविषयी लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक ठिकाणी दत्तमूर्तींची स्थापना केली, दत्तोपासनेचा प्रचार केला आणि उपासनेला सदैव प्रेरक ठरेल अशा मौलिक साहित्याची निर्मिती केली. त्यांनी सर्व प्रवास पायी केला. त्यांची ही पदयात्रा केवळ दोन छाट्या, दोन लंगोट्या व एक कमंडलू एवढ्याच साहित्यानिशी चालू असे. उज्जयिनी, ब्रह्मावर्त, बदरीकेदार, गंगोत्री, हरिद्वार, पेटलाद, तिलकवाडा, द्वारका, चिखलदरा, मेहतपूर नरसी, बढवाणी, तंजावर, मुक्ताला, पवनी, हाबनूर, कुरगड्डी, गरुडेश्वर या ठिकाणी त्यांनी संन्यस्त जीवनातील चातुर्मास काढले. यावरून त्यांच्या संचाराची व्याप्ती समजून येईल.

चातुर्मास ८ – श्रीक्षेत्र तीलकवाडा गुजराथ, नदी- नर्मदा, इ. स. १८९८, शके १८२०
गुजरात मधे नर्मदानदी काठी बडोद्याहून ५० कि. मी. अंतरावर, श्री. विष्णुगीरी महाराजांच्या वासुदेव कुटी आश्रमाजवळ, मारुती मंदिरात श्रीक्षेत्र तिलकवाडा येथे महाराज उतरले होते. तेथेच आठवा चातुर्मास झाला.
तिलकवाडा येथे मारुतीच्या मंदिरात महाराजांचा चातुर्मास झाला. हे गाव बडोदा संस्थानांतील एक महाल आहे. नोकरीनिमित्ताने आलेले ७-८ दक्षिणी ब्राह्मण व इतर गुजराथी ब्राह्मण वगैरे मंडळींची वस्ती येथे बरी आहे. येथील मंडळी भाविक असल्याने सर्व लोक नित्य महाराजांचे दर्शनास येत असत. पिशाच्च, संततिप्रतिबंध इत्यादिकांवर महाराजांनी उपाय सांगावेत आणि श्रद्धा ठेवून लोकांनी ते उपाय करून सुखी व्हावे असा क्रम सुरू होता.

‘स्वधर्माप्रमाणे वागावे म्हणजे परमेश्र्वर कल्याण करील’ असे त्यांना महाराजांचे नित्य सांगणे असे.
प्रभासक्षेत्राहून निघून महाराज प्राचीसरस्वतीस जाऊन पोचले. या ठिकाणीच येऊन श्रीकृष्ण परमात्मा निजधामास गेले होते. तेथे वंदन करून महाराज पोरबंदर म्हणजे सुदामपुरी या ठिकाणी आले. तेथे काही दिवस वास्तव्य करून नंतर ज्येष्ठ मासांत श्रीक्षेत्र द्वारका या सातव्या मुक्तिपुरीत महाराज येऊन पोचले.
श्री स्वामी महाराजंनी तिलकवाड चातुर्मासात कुर्मपुराण देवनागरीत व अनुसया स्तोत्र लिहिले . तीलकवाड चातुर्मासात स्वामी महाराजांनी आपल्या प्रवचनात नर्मदाखंडावर पुराण सांगितले शिवाय आन्ध्र लिपीत असलेला ‘कूर्म पूराण’ हा ग्रंथ देवनागरी लिपीत लिहून काढला. पुढे आश्वीन महिन्यात स्वामी महाराज तिलकवाड वरून वरकाळ जवळ असलेल्या अत्रीमूनींच्या आश्रमात आले तिथे त्यांनी अनुसया मातेवर एक स्तुतीपर पद रचले
संपर्क: प,पू वासुदेवानंद सरस्वती कुटी मु.पो. तिलकवाडा जि.नर्मदा गुजरात
श्री गौरांग पाठक ०९४२७१५७२७८

श्रीदत्त परिक्रमेत आज दत्तबावनी लिहिणारया रंगावधूत महाराजांची कर्मभूमी
– श्रीक्षेत्र नारेश्वर आणि श्रीक्षेत्र तिलकवाडा या दत्तस्थानांचे दर्शन घेतले. परवा आपण वासुदेवानंद सरस्वती महाराजांची लिलाभूमी असलेल्या श्रीक्षेत्र गरुडेश्वरचे दर्शन घेऊ या!
(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com /श्रीगुरुचरित्र)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Shree Datta Parikrama Rangavadhut Maharaj Nareshvar by Vijay Golesar


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – सहसा माणसे हे काम करतात…

Next Post

‘सलमान खानने मला सिगारेटचे चटके देऊन मारहाण केली’, माजी गर्लफ्रेंड सोमी अलीचे धक्कादायक आरोप

Next Post

'सलमान खानने मला सिगारेटचे चटके देऊन मारहाण केली', माजी गर्लफ्रेंड सोमी अलीचे धक्कादायक आरोप

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group