इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडपासून टॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाने स्वतःचे स्थान निर्माण करणारे खलनायक आशिष विद्यार्थी पुन्हा एकदा बोहल्यावर चढले आहेत. वयाच्या साठीत त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आशिष यांनी हिंदीसोबतच, मराठी, तेलुगू, तामिळ, कन्नडा, इंग्लिश अशा जवळपास सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
कधी, कुठे, कसं फुललं प्रेम?
आशिष आणि रुपाली या दोघांची पहिली भेट एका फॅशन शूट दरम्यान झाली होती. शूटिंगनंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. नेहमीप्रमाणेच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघे एकमेकांना डेट करू लागले. गेल्या काही वर्षांपासून ते एकत्र होते, अखेर काल त्यांनी रजिस्टर मॅरेज केले.
लग्नानंतर काय म्हणाले आशिष विद्यार्थी?
“आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणं ही एक खूपच खास फिलिंग आहे.” आपल्या लव्ह स्टोरीबाबत फारसे काही सांगण्यास ते तयार नाहीत. ते सांगतात की, ही खूप मोठी कहाणी आहे, नंतर फुरसतीत सांगेन. रुपाली यांच्या भेटीबद्दल आशिष यांनी स्पष्टपणे काही सांगितले नसले तरी काही रिपोर्ट्सनुसार, दोघांनी लग्नाआधी एकमेकांना बराच काळ डेट केले आहे.
कोण आहे रुपाली बरुआ?
रुपाली बरुआ ही आसाममधील गुवाहाटी येथील रहिवासी आहे. तिचे कोलकात्यात फॅशन स्टोअर आणि स्वतःचा व्यवसाय आहे. रुपाली बरुआ ही बुटीक आणि कॅफे चालवते. रुपाली म्हणाली की, काही काळापूर्वी त्यांची भेट झाली आणि मग त्यांनी हे नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला.
https://twitter.com/AshishVid/status/1656581541034872832?s=20
Actor Ashish Vidyarthi Rupali Barua Love Story