मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई – आग्रा महामार्गावरील उमराणेच्या सांगवी फाट्यावर कंटेनरला भरधाव बसने जोरदार धडक दिल्याने जवळपास ४० प्रवाशी जखमी झाले. त्यापैकी ३ ते ४ प्रवाश्यांची प्रकृती गंभीर असून आहे. घटनेची माहिती मिळताच उमराणा येथील जाणता राजा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यानी मदत कार्य राबवून जखमींना उमराणे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती..