रविवार, मे 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आमदार पुत्राने बांधली सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्नगाठ; सर्वत्र कौतुकाची थाप

by India Darpan
मे 11, 2023 | 6:30 pm
in राज्य
0
FvyRWk7WcAY FL

लातूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून एक आदर्श विवाह सोहळा आज औसा येथे होत आहे. आपल्या मुलाच्या विवाहाबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 25 जोडप्यांचा विवाह अत्यंत भव्यदिव्य करून आदर्श निर्माण केला आहे. इतर लोकप्रतिनिधींनी आ. पवार यांचा आदर्श घेतल्यास सर्वसामान्य कुटुंबातील विवाह सोहळे दिमाखात होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच आमदार अभिमन्यू पवार आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनचे कौतुक करून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून क्रिएटिव्ह फाउंडेशनने औसा येथील उटगे मैदानावर आयोजित केलेल्या औसा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, कष्टकरी व आर्थिक दुर्बल कुटुंबातील 25 जोडप्यांच्या या सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. आ. अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव अ‍ॅड. परिक्षीत व डॉ. उदय मोहिते पाटील यांची कन्या डॉ. चैताली यांचा विवाह याच सामुदायिक विवाह सोहळ्यात पार पडला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खनिकर्म व बंदरे विभागाचे मंत्री दादा भुसे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री, लोकसभा सदस्य, विधानसभा व विधानपरिषद सदस्य, गहिनीनाथ महाराज औसेकर यावेळी उपस्थित होते.

सामूहिक विवाह सोहळा | औसा, लातूर https://t.co/iNjlnbDhRl

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 10, 2023

आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न दिमाखात व्हावे, हे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या मुलाच्या विवाहाबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील, कष्टकरी कुटुंबातील 25 जोडप्यांचा भव्यदिव्य विवाह सोहळा घडवून आणून हे स्वप्न साकार केले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

आपल्या मुलाला जे कपडे तेच कपडे सामुदायिक विवाह सोहळ्यातील 25 वरांना, यासह सर्व गोष्टी सारख्या करून आमदारअभिमन्यू पवार यांनी अत्यंत चांगला पायंडा पाडल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आपले कुटुंब समजून आ. पवार यांनी 25 मुलींचे कन्यादान केले. आहेर केले, संसार उपयोगी वस्तू दिल्या. आपल्या आनंदात इतरांचा आनंद बघणारे आ. पवार म्हणूनच वेगळे आहेत. हा लग्नसोहळा अत्यंत सुनियोजित, दिमाखदार होत असून हा या 25 कुटुंबांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही यावेळी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. लातूर जिल्ह्याच्यावतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सर्वांचे स्वागत करून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. आमदार अभिमन्यू पवार यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यामागील संकल्पना सांगताना, हा सर्व विवाह सोहळा घडवून आणण्यात कार्यकर्ते, स्नेही यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.

LIVE | आमदार अभिमन्यू पवार यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम राबवित आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, कष्टकरी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी सामूहिक विवाह सोहोळा आयोजित केला आणि…
औसा, लातूर येथे माझे मनोगत..#Latur@AbhiPawarBJP https://t.co/82UkwoPBxW

— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 10, 2023

MLA Son Wedding in Community Ceremony

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावधान! पुढचे काही दिवस प्रचंड उष्णतेचे; असा आहे हवामान विभागाचा इशारा

Next Post

दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) आणि उद्योग निरीक्षक (उद्योग संचालनालय) या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

Next Post
mpsc

दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) आणि उद्योग निरीक्षक (उद्योग संचालनालय) या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या,रविवार, ११ मेचे राशिभविष्य

मे 11, 2025
Untitled 22

भारतातील ५ राज्यातील २० शहरांवर पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ला…भारताने दिले असे प्रत्त्युत्तर

मे 10, 2025
Hon CM @ Metro 3 phase opening 2 1024x953 1 e1746811674674

मुंबई मेट्रो लाईन-३ सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

मे 9, 2025
IMG 20250509 WA0079 1024x683 1

पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मे 9, 2025
Untitled 21

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा, त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान…लोकसभा अध्यक्ष

मे 9, 2025
crime 13

घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011