बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) आणि उद्योग निरीक्षक (उद्योग संचालनालय) या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

by India Darpan
मे 11, 2023 | 8:14 pm
in राज्य
0
mpsc

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२३ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे व दिनांक २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी मुंबई जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ मधील दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ०९ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे.

परिक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील मानेदेशमुख अनिकेत सिद्धेश्वर हे राज्यातून प्रथम आले आहेत. सांगली जिल्ह्यातील साळुंखे अभिजीत अशोक हे मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीमती कुपटे अक्षता महादेव ह्या प्रथम आल्या आहेत.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आयोगाने कळविले आहे.

उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ मधील उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ०६ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे.

परीक्षेमध्ये सातारा जिल्ह्यातील नाना जोतिराम दडस हे राज्यातून व मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून ठाणे जिल्ह्यातील श्रीमती भाग्यश्री भाऊसाहेब सांगळे ह्या प्रथम आल्या आहेत. उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आयोगाचे परिक्षोत्तर ( अ.प.) उप सचिव यांनी कळविले आहे.

MPSC February Exam Result Declared

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आमदार पुत्राने बांधली सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्नगाठ; सर्वत्र कौतुकाची थाप

Next Post

नवी मुंबईकरांना मोठा दिलासा… सुरू झाले सायबर पोलीस ठाणे… ऑनलाईन फसवणुकीला दाद मागता येणार

Next Post
thane1 1140x441 1

नवी मुंबईकरांना मोठा दिलासा... सुरू झाले सायबर पोलीस ठाणे... ऑनलाईन फसवणुकीला दाद मागता येणार

ताज्या बातम्या

fir111

हप्ता न दिल्याने संतप्त टोळक्याने घराच्या काचा फोडल्या…नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मे 14, 2025
accident 11

भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वार ठार

मे 14, 2025
Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011