India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बारावी परिक्षा कॉपी प्रकरण: या शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हे दाखल

India Darpan by India Darpan
March 1, 2023
in संमिश्र वार्ता
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे पेपर सोडवावा आणि कॉपी करण्याचा प्रयत्न करू नये, याची जबाबदारी शिक्षकांवर असते. पण विद्येच्या माहेरघरी अर्थात पुण्यातील दौंड तालुक्यात शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचे काम करीत होते. त्यामुळे या शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बारावीची परीक्षा सुरू झाली की कॉपीची अनेक प्रकरणे पुढे येतात. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत या घटना कानावर पडत असतात. पण यात बहुतांश प्रमाणात विद्यार्थीच आरोपी असतात. पण कधीकधी शिक्षकही यामध्ये सहभागी असतात. अशीच घटना दौंड तालुक्यातील केडगाव येथील जवाहर माध्यमिक विद्यालयात घडली आहे. या शाळेत बारावीची परीक्षा सुरू असताना अचानक भरारी पथकाने धाड टाकली. वर्गखोल्यांमध्ये गेल्यानंतर विद्यार्थी सामूहिक कॉपी करीत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे विद्यार्थी हा संपूर्ण प्रकार शिक्षकांच्या देखरेखीत करीत होते. भरारी पथकाला ते स्पष्टपणे जाणवले. या प्रकरणाचा प्राथमिक तपास केल्यानंतर भरारी पथकात सामील प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी नऊ शिक्षकांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शिक्षकांवर गुन्हे दाखल करीत पुढील कारवाई सुरू केली आहे. परभणी येथे याआधी सहा शिक्षक इंग्रजीचा पेपर शाळेच्या मागे बसून सोडवताना आढळले होते. हे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत होते. त्यांच्यावरही कारवाई झाली होती.

हे कसले कॉपीमुक्त अभियान?
शिक्षण मंडळ संपूर्ण राज्यात शिस्तबद्ध परीक्षा व्हावी, यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबवीत आहेत. भरारी पथकांच्या फेऱ्या तर सुरू असतातच, शिवाय पोलीसांचा ताफाही परीक्षा केंद्रांबाहेर उभा ठेवण्यात आला आहे. तरीही एखाद्या शाळेतील नऊ शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत करतात, ही आश्चर्याची बाब आहे. त्यामुळे आता हे कसले कॉपीमुक्त अभियान, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

केंद्र संचालकही सामील
विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याच्या प्रकरणात चक्क परीक्षा केंद्र संचालक जालिंदर काटे आणि उपकेंद्र संचालक रावसाहेब भामरे यांचाही समावेश आहे. यांच्यासह प्रकाश कुचेकर, दिवेकर विकास, गोरगल शाम, कविता काशीद, जयश्री गवळी, सुरेखा होन, अभय सोननवर या शिक्षकांवर महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा सन १९८२, महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परीक्षा कायदा १९८२च्या कलम आठप्रमाणे यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Previous Post

सत्तासंघर्ष सुनावणी; शिंदे गटातर्फे करण्यात आला हा युक्तीवाद

Next Post

गायरान जमिनीवरील अतिक्रमण पडणार महागात ! राज्यभरात इतकी आहे बेकायदेशीर बांधकामे

Next Post

गायरान जमिनीवरील अतिक्रमण पडणार महागात ! राज्यभरात इतकी आहे बेकायदेशीर बांधकामे

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group