नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुर्गानगर भागात दुचाकीस्वार त्रिकुटाने मोबाईल बळजबरीने काढून रस्त्याने पायी जाणा-या तरूणास शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्ष गणेश चित्ते (२० रा.दुर्गानगर,अमृतधाम) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चित्ते गुरूवारी (दि.९) कामावरून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. दुर्गानगर भागातील नक्षत्र अपार्टमेंट भागातून तो पायी जात असतांना पाठीमागून पल्सर दुचाकीवर आलेल्या तीघांनी त्यास अडविले. यावेळी संशयितांनी त्यास शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील सुमारे सात हजार रूपये किमतीचा मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला.अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.