नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या संशयितास पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारचाकीतून आलेल्या संशयितास मुलीच्या कुटुंबियांनी जाब विचारला असता त्याने भावासह काकास बेल्टने मारहाण केली. याप्रकरणी मालधक्कारोड भागात राहणा-या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गुरूवारी (दि.९) रात्री संशयिताने चारचाकीतून मुलीच्या घरासमोर येवून मोठ्या आवाजात गाणे वाजविले. यावेळी माझ्या आयटमचा वाढदिवस आहे तुला भेटायला आलो असे म्हणून त्याने मुलीकडे बघून अश्लिल चाळे केले. ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास आल्याने पीडितेचा भाऊ व काका संशयितास जाब विचारण्यासाठी गेले असता संशयितांने आरडाओरड करीत काका व भावाला कमरेच्या पट्याने मारहाण करून जखमी केले. अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या संशयितास पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारचाकीतून आलेल्या संशयितास मुलीच्या कुटुंबियांनी जाब विचारला असता त्याने भावासह काकास बेल्टने मारहाण केली. याप्रकरणी मालधक्कारोड भागात राहणा-या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गुरूवारी (दि.९) रात्री संशयिताने चारचाकीतून मुलीच्या घरासमोर येवून मोठ्या आवाजात गाणे वाजविले. यावेळी माझ्या आयटमचा वाढदिवस आहे तुला भेटायला आलो असे म्हणून त्याने मुलीकडे बघून अश्लिल चाळे केले. ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास आल्याने पीडितेचा भाऊ व काका संशयितास जाब विचारण्यासाठी गेले असता संशयितांने आरडाओरड करीत काका व भावाला कमरेच्या पट्याने मारहाण करून जखमी केले. अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.