घोटी – घोटी शहरात ग्रामपालिकेच्या वतीने जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपालिकेने प्रसिद्धी पत्रक काढले असून घोटी शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेबाबत उपाय योजना करणेसाठी आज शुक्रवार ९ रोजी ग्रामपालिका घोटी बुद्रुक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. ह्या बैठकीमध्ये ग्रामस्थ यांच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. १० ते १८ एप्रिल पर्यंत घोटी बुद्रुक शहरात जनता कर्फ्यू लागु केल्याचा निर्णय घेतला असल्याने या काळात गाव पूर्णपणे बंद राहील. या काळात दवाखाने व मेडीकल हे सुरळीत चालु राहतील, दुध विक्री सकाळी २ तास व सायंकाळी २ तास सुरु राहील
जनता कर्फ्यू झाल्यानंतर प्रत्येक दुकानदाराने कोरोनाची टेस्ट करुन घेवूनच दुकान सुरु ठेवावे. ज्या दुकानदारांच्या कुटुंबात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतील त्यांनी आपले दुकान १४ दिवस बंद ठेवावे, जनता कर्फ्यू कालावधीत कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरु नये. घरीच थांबुन प्रशासनास सहकार्य करावे