मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्ते आणि पॅनलिस्ट यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मंजुरीनंतर निवड झालेल्या १० प्रवक्ते आणि ३३ पॅनलिस्ट (चर्चा प्रतिनिधी)ची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात उत्तर महाराष्ट्र प्रवक्तेपदी खासदार डॉ. भारती पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पॅनलिस्टमध्ये नाशिकचे प्रदीप पेशकार, लक्ष्मण सावजी या नाशिककरांचा समावेश आहे.
जाहीर झालेली नावे अशी,
मुख्य प्रवक्ता – केशव उपाध्ये
प्रवक्ता –
खासदार भारती पवार – उत्तर महाराष्ट्र,
आमदार गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र,
आमदार राम कदम – मुंबई,
शिवराय कुलकर्णी – विदर्भ,
एजाज देखमुख – मराठवाडा,
भालचंद्र शिरसाट – मुंबई,
धनंजय महाडीक – प. महाराष्ट्र,
राम कुलकर्णी – मराठवाडा,
श्वेता शालिनी – पुणे,
अॅड. राहुल नार्वेकर – मुंबई.
पॅनेलिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आलेले सदस्य –
गणेश हाके, अतुल शाह, आ.गिरीष व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ.अनिल बोंडे, आ.अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता परूळेकर, आ.सुरेश धस, प्रदीप पेशकार, आ.निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीति गांधी.
मीडिया सेल सदस्य – देवयानी खानखोजे