अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मुंबई बरोबर आता ग्रामीण भागातही शिंदे गटाचे वर्चस्व होत असल्याचे बघायला मिळत असून आज येवला तालुक्यातील युवा सेनेचे ५० ते ५५ पदाधिकारी व कार्यकर्ते हे शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई येथे रवाना झाले आहे. दोन दिवसापूर्वीच युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा येवला दौरा झालेला असतानाच अचानक तालुक्यातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना समर्थन देण्यासाठी आता ग्रामीण भागातून देखील युवा सेनेचे काही पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्यास सुरुवात झाली आहे. येवला तालुक्यातील युवा सेनेचे ५० पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहे. हे युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते येवला येथून बसने मुंबईकडे रवाना झाले आहे. दुपारी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणारा असून त्यानंतर येवल्यात आल्यावर मोठा जल्लोष साजरा करणार आहे.
आमचे कार्यकर्ते नाही
गेलेले कार्यकर्ते आमचे नाहीत आणि युवासेना फुटलेली नाही असा खुलासा युवासेनेचे शहर अधिकारी लक्ष्मण गवळी यांनी केला आहे.