नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव येथील पदादिकारी व नाशिक येथील ३४ नगरसेवक यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मुंबईत भेट घेत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. यावेळी मालेगावचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. तीन दिवसापूर्वीच युवानेते आदित्य ठाकरे यांचा नाशिक जिल्हा दौरा झाला. त्यानंतर आज शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी हे मुंबईला गेले. यावेळी नाशिकच्या पदाधिकारी यांनी संपूर्ण शिवसेना पाठीशी असल्याचे सांगितले. खासदार हेमंत गोडसे, मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे, नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे हे शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आज ही भेट महत्त्वाची होती.