सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सण आणि संस्कृतीची परंपरा पाळणा-या येवला शहरात गेल्या अनेक वर्षां पासून महालक्ष्मीच्या स्थापनेच्या दुस-या दिवशी महालक्ष्मी समोर विविध प्रकारचे देखावे सादर केले जातात. दराडे फाऊंडेशनतर्फे यंदाही या देखावे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. कोणाच्या घरात भारतीय स्वातंत्र्यांच्या चळवळीत सहभाग घेतल्या क्रांतीवीरांचा देखावा तर कोणी प्रतापगडावरील अफजल खानाचा वधाचा देखाव, तर कुठे भारतीय संस्कृतीमधील व ग्रामिण भागातील दशावतारी आखाडी सोंग, महिषासुर वध, वारी रिंगण असे विविध सुंदर देखावे सादर करण्यात आले होते. ज्या ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला रात्री उशिरा पर्यंत परिक्षकांनी त्यांच्या घरी जाऊन देखाव्यांचे परिक्षण केले. यात विजेत्या स्पर्धकांना बक्षिस म्हणून पैठणी देण्यात येणार आहे. बघू महालक्ष्मी समोरचे सुंदर देखावे…..