अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सतत पडणाऱ्या रोगराईमुळे संतप्त होत येवला तालुक्यातील एरंडगाव येथील सतीश ठोंबरे या शेतकऱ्याने अक्षरशः पाच एकर उभ्या डाळिंब बागावर नांगरून फिरवला आहे. या शेतकऱ्याने पाच वर्षांपूर्वी पाच एकर क्षेत्रामध्ये डाळिंबाचे पीक घेतले होते. मात्र दरवर्षी तेल्या रोगासह नैसर्गिक आपत्तीमुळे डाळिंबाचे फळ खराब होत असल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने संतप्त होत या तरुण शेतकऱ्यांने आपल्या पाच एकर डाळिंबाच्या बागेवर रोटर फिरवून पीक नष्ट करून टाकले. रोगराई व नैसर्गिक आपत्तीचा फटका या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला बसला आहे.