नाशिक : गावठी कट्टे विक्रीसाठी आलेला संशयिताला पोलिसांनी गजाआड करुन त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीच्या दोन पिस्तूलांसह जीवंत काडतुसे हस्तगत केले आहेत. दिपक विष्णू सदाकळे (३५ रा.चंद्रकमल हौ.सोसा.जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई भद्रकाली पोलिसांनी शालिमार भागात केली.
भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी विशाल काठे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी (दि.१९) रात्री एक तरूण शालिमार बस थांबा भागात गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री सापळा लावण्यात आला होता. पोलिस पथक परिसरात दबा धरून बसलेले असतांना रात्री अडिच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. नेहरू गार्डन कडून अॅटोरिक्षातून संशयित आला होता. बस थांब्यावर तो कुणाची तरी प्रतिक्षा करीत असल्याचा संशय येताच पथकाने त्याच्यावर झडप घालून अटक केली. संशयिताच्या अंगझडतीत दोन गावठी बनावटीचे कट्टे आणि जीवंत काडतुसे असा सुमारे ६० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांचया मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते,किशोर खांडवी पोलिस नाईक विशाल काठे,रमेश कोळी,संदिप शेळके,महेशकुमार बोरसे,अंमलदार सागर निकुंभ,नितीन भामरे,गोरख साळुंखे, धनंजय हासे व विशाल गायकवाड आदींच्या पथकाने केली.