अजय सोनवणे, येवला
नाशिक जिल्हयाच्या ग्रामिण भागात सध्या उन्हाची तिव्रता वाढत आहे त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात सर्वत्र फिरतांना पहावयास मिळते.जिल्हयाच्या येवला तालूक्यात हरणां बरोबरच राष्ट्रीय पक्षी मोरांची मोठी संख्या आहे. रेंडाळे येथिल शेतकरी आणि वन्यजीवप्रेमी प्रविण आहेर यांनी वन्यप्राणांची पाण्याची सोय व्हावी यासाठी आपल्या शेतात सिमेंटची पाण्याची टाकी तयार करुन पाण्याची सोय केलीय. त्यामुळे त्यांच्या शेतात सकाळ-संध्याकाळच्या सुमारास मोर-लांडोर बिनधास्त पाणी पिण्यासाठी येत असतात. त्याच बरोबर पिसारा फुलवत मनसोक्त नाचण्याचा आनंद घेत असल्याच व्हिडीओ प्रविण आहेर यांनी काढला आहे..