येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला – वैजापूर रोडवर आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास औरंगाबादकडून येवल्याकडे येणाऱ्या लोखंडी सळ्यानी माल ट्रकला अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीत जाऊन पलटी झाला. या अपघातात गाडी चालक केबिनमध्ये अडकल्यामुळे चालकाला जेसीबीच्या साहयाने कॅबिन तोडून व पत्रा कापून बाहेर काढण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.