येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-औरंगाबाद-सिल्लोड डेपोची बस सायंकाळी येवला शहरात आली असता ओव्हर हिटींग मुळे बसच्या रेडीएटर मधून अचानक धूर येऊ लागला. बस चालकाच्या लक्षात ही बाब येताच त्याने बस रस्त्याच्या कडेला तातडीने थांबवत तात्काळ बसमधील सर्व ५४ प्रवाशांना सुखरुप खाली उतरवले. त्यानंतर आजू-बाजूच्या ठिकाणाहून पाणी आणून निघणारा धूर थांबवला. जर हा प्रकार आणखी काही वेळा नंतर लक्षात आला नसता तर बसला आग लागू शकली असती. त्यामुळे चालकाने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधाना मुळे मोठा अनर्थ टळला.