येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला शहर पोलिसांची नायलॉन मांजा विरुध्द नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार ही कारवाई पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या सह उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने केली कारवाई केली. या मोठ्या कार्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नायलॉन मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. संक्रात उत्सव दरम्यान नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर देखील कार्यवाही होणार आहे.