येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील सातळी येथील मनोज सुभाष शिंदे या तरुणाचा शेतातील शेतळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तो कांदा लागण सुरू असल्याने शेततळ्यातून डोंगळा टाकून पाणी देण्यासाठी शेतळ्यावर गेला होता. पण, त्याचा पाय शेततळ्यात घसरला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. शेतातील कांदा लागवड करणाऱ्या महिलांनी आरडाओरडा केला. मात्र कोणालाच पोहता येत नसल्याने त्याला वाचविण्यात अपयश आले आणि बुडून त्याचा मृत्यू झाला.