नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गेल्या चार दशकांपासून ग्रंथालय सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. या निमित्ताने विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. याच वेळी विविध वाड.मयीन पुरस्काराचे वितरण होणार आहे. सन २०१ ९ व २०२० ( कोरोना काळात सदर पुरस्कार दिले गेले नाहीत या दोन वर्षाचे पुरस्काराचे वितरण होणार आहे. कार्यक्रम शनिवार २४ डिसेंबर ते शनिवार ३१ डिसेंबर , २०२२ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
ग्रंथालय सप्ताहात होणाऱ्या कार्यक्रम व व्याख्यानाचे स्वरूप पुढील प्रमाणे.
शनिवार दि . २४ डिसेंबर दिलीप प्रभावळकर यांची ” मुलाखत ” संवादक अपर्णा वेलणकर व प्रा . अनंत येवलेकर ( कै . अन्नपूर्णाबाई डोळे स्मृती व्याख्यान )
रविवार दि . २५ डिसेंबर न्यायमूर्ती माधव जामदार, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांचा विषय आहे “ भारतीय राज्य घटनेला अभिप्रेत असलेला ” न्याय ” ( कै . काकासाहेब आकूत स्मृती व्याख्यान )
सोमवार २६ डिसेंबर रामदास फुटाणे यांचा ” भारत कधी कधी माझा देश ” विषयावर व्याख्यान होणार आहे . यावेळी ( उत्कृष्ट स्त्री वाचक / उत्कृष्ट पुरुष वाचक व बालवाचक पुरस्कार ) ( बी.लिब व एम . लिब.अभ्यासक्रमात प्रथम येणा – या विद्यार्थ्यास कै . मु . शं . औरंगाबादकर स्मृती पुरस्कार प्रदान )
मंगळवार दि . २७ डिसेंबर अच्युत गोडबोले याचे ” माझा लेखन प्रवास ” ( माझी लेखनाची मुशाफिरी ) या विषयावर व्याख्यान व त्यांच्याहस्ते विविध वाङ्मयीन पुरस्कार वितरण समारंभ होईल . ( २०१ ९ -२० )
बुधवार दि . २८ डिसेंबर , वाचक मेळावा ( ६ ते ७ ) व प्रश्न मंजूषा ( सायं . ७ ते ८ ) सावाना सभासदांसाठी खुला असणार आहे .
शुक्रवार दि . ३० डिसेंबर पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे “ जनजाती ; प्राचीन भारताचा वैभव संपन्न वारसा ” या विषयावर कै . सावित्रीबाई वावीकर स्मृती व्याख्यान होणार आहे . यांच वेळी ( आदिवासी क्षेत्रात काम करणा – या सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान ) होईल . व
रील दि . २४ ते ३० डिसेंबर पर्यंतचे कार्यक्रम स्व.मु. शं . औरंगाबादकर सभागृह येथे होणार आहेत .
शनिवार दि . ३१ डिसेंबर ज्येष्ट साहित्यिका नीरजा धुळेकर यांचे ” अभिव्यक्ती आणि सेन्सॉरशिप ” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
यांच वेळी त्यांच्या हस्ते विविध वाङ्मयीन पुरस्कार वितरण समारंभ ( २०२०-२१ ) फक्त दि . ३१ डिसेंबर , २०२२ चा कार्यक्रम प . सा . नाटयमंदिर येथे होईल. या ज्ञानयज्ञात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे आवाहन अध्यक्ष प्रा . दिलीप फडके , उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव , डॉ. सुनील कुटे , कार्याध्यक्ष गिरीश नातू , प्रमुख सचिव डॉ . धर्माजी बोडके, सह.सचिव अँड . अभिजित बगदे , ग्रंथ सचिव जयप्रकाश जातेगावकर, सांस्कृतिक सचिव संजय करंजकर व सावाना कार्यकारी मंडळाने केले आहे.
सार्वजनिक वाचनालय , नाशिक नाशिक वाड्.मयीन पुरस्कार हस्ते – मा . अच्युत गोडबोले –
दि . २७ डिसेंबर २०२२ सायं . ६.०० वा . ( सन २०१ ९ चे पुरस्कार )
१ ) कै . धनंजय कुलकर्णी ( कादंबरी ) नदीष्ट मनोज बोरगावकर
२ ) डॉ . वि.म. गोगटे पुरस्कार ( ललितेतर ग्रंथास ) – कोरडी शेतं …. ओले डोळे दीप्ती राऊत
३ ) मु . ब . यंदे पुरस्कार ( सामाजिक / वैचारिक ग्रंथास ) घातसूत्र दीपक
४ ) पु . ना . पंडित पुरस्कार ( लघुकथासंग्रह ) अस्वस्त तांडा – डॉ . विजय जाधव
५ ) डॉ . अ . वा . वर्टी कथालेखक पुरस्कार ( उमेदीने लेखन करणाऱ्यास ) – निर्णय – संजय गोराडे –
६ ) अशोक देवदत्त टिळक ( चरित्रात्मक कादंबरी ) – द्रष्टा अनुयांत्रिक अनिता पाटील
७ ) ग . वि . अकोलकर पुरस्कार ( शैक्षणिक / वैचारिक ग्रंथास ) – इंडोनेशायन – रवि वाळेकर
८ ) वि . दा . सावरकर पुरस्कार ( अनुवादित ) – तुम्ही बी घडा ना सुलक्षणा महाजन / करुणा गोखले – –
सार्वजनिक वाचनालय , नाशिक – नाशिक वाड्.मयीन पुरस्कार-
हस्ते – ज्येष्ठ साहित्यिका मा . नीरजा दि . ३१ डिसेंबर २०२२ सायं . ६.०० वा . ( सन २०२० चे पुरस्कार )
१ ) कै . धनंजय कुलकर्णी ( कादंबरी ) – लॉक डाऊन- ज्ञानेश्वर जाधवर
२ ) डॉ . वि.म. गोगटे पुरस्कार ( ललितेतर ग्रंथास ) – विडीची गोस्ट- डॉ . शंकर बोऱ्हाडे
३ ) मु . ब . यंदे पुरस्कार ( सामाजिक / वैचारिक ग्रंथास ) – चंबूखडी ड्रीम्स – डॉ . जगन्नाथ पाटील –
४ ) पु . ना . पंडित पुरस्कार ( लघुकथा संग्रहास ) – विस्तारणारं क्षितीज – नीलिमा भावे –
५ ) डॉ . अ . वा . वर्टी कथालेखक पुरस्कार ( उमेदीने लेखन करणाऱ्यास ) – ब्रँड फॅक्टरी – मनोहर सोनवणे
६ ) अशोक देवदत्त टिळक ( चरित्रात्मक कादंबरी ) – समर्पण – मंजूश्री गोखले –
७ ) ग.वि.अकोलकर पुरस्कार ( शैक्षणिक / वैचारिक ग्रंथास ) – प्रेक्षणीय महाराष्ट्राची भटकती- ओंकार वर्तले
८ ) वि . दा . सावरकर पुरस्कार ( अनुवादित ) बिहाइंड दी सिन्स – मुकुंद वझे