अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पैठणीचे माहेरघर असलेल्या येवल्यातील प्रतिष्ठित अशा कापसे पैठणी उद्योग समूहाला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज वडगाव बल्हे येथे भेट दिली. त्यांनी याठिकाणी दिव्यांग कारागिरांनी साकारलेल्या पैठणीवरील हस्तकला व विणकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कापसे कुटुंबियांच्या वतीने छगन भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी कापसे उद्योग समूह मुख्यालय परिसरातील कापसे फाऊंडेशनच्या अहिल्या गोशाळा, आदिवासी विद्यार्थी विणकर प्रशिक्षण केंद्र, दिव्यांग मुकबधिर मुलांचे मोफत प्रशिक्षण केंद्र, निवास व्यवस्था, पैठणी विणकर कला केंद्राची पाहणी केली.