येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवाा) – कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येवला येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कृषी बाजार समिती आवारात निदर्शने करीत ठिय्या आंदोलन केले. नाफेडची खरेदी सुरू करावी, कांद्याचे निर्यात शुल्क शून्य करून निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, कांद्याला हमीभाव द्यावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनापूर्वी कांदा लिलाव बंद करण्यात आले तर शेतकरी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले आहे.