येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र तथा जवान अजित शेळके यांचा देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. येवला तालुक्यातील ग्रामीण भागातून पुढे येऊन शिक्षण घेत सैन्यदलात भरती झालेले वीरजवान अजित शेळके यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय शहीद जवान शेळके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, असे येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
राजस्थानातील गंगानगर येथे ते सेवेत होते. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी जवान अजित शेळके यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अजित हे ड्युटीवरून घरी जात होते. त्याचवेळी त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
Yeola Javan Ajit Shelake Death in Rajasthan