अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला शहरातील ममता स्विट मार्ट मधील मिठाई विक्रेत्याने रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने सहा हजार रुपये किलोची किमतीची चक्क २४ कॅरेट सोन्याचा मुलामा असलेली मिठाई तयार करुन विक्रीला ठेवलेली आहे. गोल्डन लिफ्ट आणि गोल्डन बिस्किट अशी नाव या मिठाईची असून शुध्द गावराण तूप आणि उच्च प्रतिचे ड्रायफुटचा वापर त्यासाठी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मिठाई विक्रेत्याकडे यासाठी २० किलो मिठाईची ऑडर सुध्दा बुक झाली असल्याच विक्रेत्याने सांगितले. आतापर्यंत आपण अनेक प्रकारच्या मिठाई पाहिल्या असतील अगदी चांदीचा मुलामा असलेली मिठाई सुध्दा मोठ्या शहरात सणाच्या काळात विक्रीला ठेवण्यात आलेल आपण पाहिल असेल, मात्र नाशिक जिल्हयातील पैठणीच शहर अशी ओळख आहे. पण, आता सोन्याचा मुलामा असलेली मिठाई चर्चेची ठरली आहे.