येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील नगरसुल गावातील मोठा मळा भागातील किरण पवार यांच्या विहिरी मध्ये हरिण पडल्याची घटना सकाळच्या सुमारास समोर आली. त्यानंतर पवार यांनी त्याची माहिती वनविभागाला दिली असता वनकर्मचा-यांनी तातडीने घटनास्थळी आले.
त्यांनी विहिरी पिंजरा सोडत ग्रामस्थांच्या मदतीने विहिरतून सुखरुपणे हरणाला बाहेर काढत त्याला जीवदान दिले. हरण बाहेर येताच त्याला पुन्हा त्याच्या जंगलातील अधिवासात वनविभागाने सोडून दिले. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधात हरणाचे कळप हे फिरत असतात. येथेही पाण्यासाठी विहिरीच्या कडेला गेल्यानंतर हे हरिण पाण्यात पडले असल्याचे बोलले जात आहे.