अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कार्यक्रम कुठलाही असो डीजेचा आवाज वाढल्याशिवाय राहत नाही. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय, म्हणत अनेक जण डीजेवाल्याला प्रोत्साहित करत असतात. अहमदनगरमधील अशाच एका कार्यक्रमात डीजेच्या आवाजाने शिक्षकाचा बळी गेल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ माजली आहे.
अहमदनगरमध्ये अशोक खंडागळे नावाच्या शिक्षकाचा नाचता नाचता अचानक जीव गेल्याची घटना घडली आहे. अशोक खंडागळे हे श्रीगोंदा येथील नारायण आश्रमाचे केंद्रप्रमुख होते. ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते.हनुमान जयंतीच्या दिवशी कौडाणे गावात गेले होते. त्यावेळी डीजेचा मोठा आवाज सुरू होता. त्या डीजेचा त्यांना त्रास झाला. त्यामुळे अशोक यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अशोक रुग्णालयात दाखल केल्यानंतर कोमात गेले होते. काही काळ श्रीगोंदा येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना पुण्याला हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या उपचारांना यश आले नाही. आवाजाचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला होता. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.
नेहमी घडतात घटना
आज-काल लग्न समारंभात आणि विविध मिरवणूकांमध्ये डीजे वाजवणे हे एक फॅशन झाली आहे. या डीजेच्या आवाजामुळे अनेक लोकांना आता याचा त्रासही जाणवू लागला आहे. या डीजेच्या कर्कश आवाजामुळे काही वयोवृद्ध लोकांना ऐकण्यासाठी कमी येण्याचा ज्ञास सुरू झाली आहे. तसेच अनेक तरुणांसह वयोवृद्ध लोकांना या डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा चटका येणे असे दुष्परिणाम या कर्कश डीजेच्या आवाजामुळे समाजात घडले आहेत.
काय म्हणाले डॉक्टर?
कर्कश डीजेच्या आवाजामुळे आपल्या शरिरातील रक्ताभिसरण वेगाने होते. तसेच या डीजेच्या आवाजामुळे मेंदूवरही परिणाम होतो आणि या कर्कश आवाजामुळे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊन अखेर माणसाचा मृत्यू होत असल्याचं डॉक्टर सचिन चव्हाण यांनी सांगितले आहे.
Ahmednagar DJ Sound Teacher Death