येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालूक्यातील कोटमगाव येथे नाशिकहून लग्नासाठी आलेल्या सविता मोकळ या विवाहसोहळा ओटोपून परत असतांना पल्सर मोटर सायकल वर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोन्याची ओरबडून पळ काढला. येवला शहर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी नाकाबंदी केली. मात्र चोरटे तो पर्यंत पसार झाले. सविता मोकळ यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिस तपास करीत आहे.