मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील फिरदोसगंज भागात राहणा-या हाकीब अहमद यांच्यावर ७ ते ८ गुंडांनी घराचा दरवाजा फोडत रात्रीच्या सुमारास तलवार व कोयता या धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात हकीब गंभीर जखमी झाला असून मागील भांडणांची कुरापत काढत त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान नातेवाईकांनी पोलीस उपअधिक्षकांची भेट घेत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसापासून मालेगावमध्ये गुंडगिरीचे प्रमाण वाढले असून त्यात ही घटना घडली आहे.