येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालूक्यातील सातळी येथील आठ दिवसापासून बेपत्ता असलेले सुरेश मोरे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत चिचोंडी रस्त्याच्या कडेला आढळून आला. बेपत्ता झाल्यापासून मोरे यांचे कुटुंबिय त्यांचा शोध घेत होते. पण, त्यांचा मृतदेह अचानक कुजलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविला.