नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली कॅम्प भागात हिंगोली येथील तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्यामुळे तरूणाला देवळाली कॅम्प पोलिसांनी छावणी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
गणेश पंजाब पठाडे (२६,रा.शिरसम, हिंगोली) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. तो आपल्याच बहिणीस सासरी सोडण्यासाठी भगूर येथे आला होता. सकाळी नाश्ता केल्यानंतर तो घराबाहेर पडला मात्र संध्याकाळपर्यंत घरी परतला नाही. दरम्यान, संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भगुर-देवळाली कॅम्प रस्त्यावर एक युवक बेशुद्धावस्थेत बेवारसपणे पडल्याची माहिती देवळाली कॅम्प पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. गणेश पठाडे यास पोलिसांनी तात्काळ देवळाली कॅम्प येथील छावणी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे सायकाळी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. उ
पचार सुरू असताना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रात्री मयत घोषित केले. गणेशची बहिणी प्रज्ञा कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशीरा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात संशयित हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित हल्लेखोराची ओळख पटली असून देवळाली कॅम्प पोलिसांसह गुन्हे शाखांची पथके त्याच्या मागावर असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कुंदन जाधव यांनी सांगितले.