येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील नगरसूल रेल्वे गेट जवळील पाटामध्ये मारुती व्हॅनच्या चालकाचा ताबा सुटून गाडी अचानक पलटी झाली. नगरसूल रेल्वे स्थानकात काचिकूडा एक्सप्रेसने येणाऱ्या प्रवाशांना घेण्यासाठी सदरची गाडी जात होती. अचानक उंचावरून गाडी खाली पडल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे, गाडीचालकाला जबर मार लागला असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.