इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कमीत कमी गुंतवणूकीवर आपल्याला जास्त जास्त फायदा व्हावा, असे बहुतांश जणांना वाटते. त्यामुळेच अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूकीकडे वाळतात, त्यामुळे त्यांना काही वेळा मोठा फायदा देखील होऊ शकतो. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा संयम त्यांना करोडपती बनवतो. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे अवंती फीड्सचे शेअर्स. हैदराबाद-आधारित या कंपनीच्या शेअरची किंमत NSE वर 8 जानेवारी रोजी 1.63 रुपये होता. तोच शेअर 30 डिसेंबर 2021 रोजी तब्बल 550.05 रुपये झाला. म्हणजेच या शेअरने छप्पर फाडके रिटर्न दिले आहेत.
सुमारे 12 वर्षांत 33,650 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 12 वर्षांपूर्वी 1.63 प्रति शेअरच्या पातळीवर खरेदी करून 1 रुपये लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाखांचे आज 3.37 कोटी झाले असते. आज सकाळी हा शेअर 553.03 रुपयांवर व्यवहार करत होता.
हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या एका महिन्यात सुमारे 525 ते 550 रुपयांपर्यंत वाढला आहे, या कालावधीत सुमारे 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत अवंती फीड्सच्या शेअरची किंमत 545.85 रूपयांवरून 550.05 रुपयांपर्यंत वाढली आहे, जी या कालावधीत 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. परंतु, गेल्या 5 वर्षांत, मल्टीबॅगर शेअरची किंमत सुमारे 175 रुपयांवरून 550 रुपयांवर गेली आहे, या कालावधीत सुमारे 210 टक्के वाढ झाली आहे.
गेल्या 10 वर्षांत, अवंती फीड्सच्या शेअरची किंमत 8.18 रुपयांवरून 5550.05 रुपयांपर्यंत वाढली आहे, या कालावधीत सुमारे 6600 टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 12 वर्षांत, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 1.63 ते 550 रुपये प्रति शेअर स्तरावर गेला आहे, त्याच कालावधीत जवळपास 337 पट वाढ झाली आहे.
एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी जर या मल्टीबॅगर स्टॉक अवंती फीड्समध्ये 1 लाख रुपयां गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख रुपयांचे आज 1.05 लाख रुपये झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या काउंटरमध्ये 1 लाख रूपये गुंतवले असतील आणि ते आजपर्यंत त्यात राहिले असेल, तर त्याचे 1 लाख रूपयांचे आज 3.10 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे आज 56.50 रुपये लाख झाले असते.
(सूचना : स्टॉकची कामगिरी येथे बातमीत आम्ही फक्त माहिती दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याच्या अधीन आहे आणि कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)