इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात कोणालाही नवीन वस्तू हवी असते, विशेषतः महिलांना तर नवी पर्स, नवीन ड्रेस, नवीन गृहपयोगी वस्तू खरेदी करण्याची आवड असते, मात्र जगात अशा देखील काही महिला आहेत की त्यांना सेकंड हॅन्ड किंवा जुन्या वस्तू त्यांना जुन्या वस्तू खरेदी करण्याचा छंद असतो. अमेरिकेत अशाच एका महिलेने जुनी पर्स लेडीज पर्स खरेदी केली, परंतु ती उघडून बघितली तर तिला आश्चर्य वाटले.
कारण एक प्रकारे पर्स उघडल्यावर तिचे जणू काही नशीबच उघडले होते. त्या पर्समध्ये चक्क पैशांचे पाकीट होते. या संदर्भातला व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होत असून त्याची चर्चा सुरू आहे. कारण असे म्हणतात की, कधी कुणाचे नशीब कसे उजळेल हे काहीच सांगता येत नाही. त्या महिलेने पर्स उघडली तेव्हा ती पाहून हैराण झाली. या बॅगेत तिला 23 हजार रूपये ठेवलेला एक लिफाफा मिळाला. महिलेने स्वत: या घटनेबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नागरिक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
या अमेरिकन महिलेचे नाव ल्योनारा सिल्वरमॅन असून तिने सांगितलं की, एका जुन्या वस्तू मिळण्याची स्टोरमधून सुमारे ५५० रूपयांची बॅग खरेदी केली होती. ही बॅग सेकंड हॅंड असूनही महिला आनंदी होती, कारण फार कमी किंमतीत तिला चांगली बॅग मिळाली होती. पण जेव्हा तिने बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यात तिला खूप पैसे सापडले. त्यासोबतच या बॅगमध्ये एक लिफाफाही होता. त्यात पत्र लिहले होते,
सिल्वरमॅन नागरिकांसमोर ही बॅग उघडताना दिसत आहे.
बॅगेत 23 हजार रूपये होते. लिफाफ्यावर मार्था नावाच्या महिलेने पत्र होते, मार्थाने पत्रात लिहिले होते की, तिला तीन मुले आहेत आणि मी मेल्यानंतर मुले माझ्या वस्तू दुसऱ्यांना देतील. त्यामुळे मी त्या वस्तू यात ठेवत आहे. कारण ही बॅग मला माझ्या पतीच्या गर्लफ्रेन्डने दिली होती. मार्थाने लिहिलं की, तेव्हापासून ही बॅग मी माझ्यासोबत ठेवली. पण पतीला कधीच संशय आला नाही की, ही बॅग त्याच्या गर्लफ्रेन्डची आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
Women Second hand bag purchase video viral