India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतावर येईल का? आकडेवारी काय सांगते? तज्ज्ञ काय म्हणताय?

India Darpan by India Darpan
July 27, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  श्रीलंकेच्या राजकीय आणि आर्थिक संकटाच्या काळात, भारत देखील अशाच संकटाच्या उंबरठ्यावर असल्याचे देशातील एक गट वारंवार सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाची सर्वाधिक चर्चा भारतावरील कर्जाची आहे. भारतावर श्रीलंकेच्या १२ पट कर्ज आहे. परंतु, भारताची आणि इतर देशांची कर्जाची आकडेवारी पाहिली तर श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतावर येणार नाही असेच प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

भारताला सध्या वेगवान विकासाची सर्वाधिक गरज असताना, त्याचे अनेक शेजारी देश आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशांततेच्या संकटात सापडले आहेत. श्रीलंकेची स्थिती तर संपूर्ण जग पाहत आहे. नेपाळ, बांगलादेश, मालदीव आणि पाकिस्तानचे चित्रही कोणापासून लपलेले नाही. वास्तविकतः या सर्व देशांमध्ये दोन गोष्टी समान आहेत. बहुतांश देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. गेल्या दोन वर्षांपासून, कोविड १९ महामारीने कमाईच्या या मार्गाचे कंबरडे मोडले आहे.

दुसरे, या देशांवर चीनचे प्रचंड कर्ज आहे, ज्याचे व्याज देऊनच त्यांची व्यवस्था कोलमडते आहे. त्यांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे उर्वरित काम पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत, शेजारी देशांसारखी परिस्थिती भारतावर येईल का यावर जोरदार चर्चा आहे. श्रीलंकेसारख्या विकसनशील देशांसाठी कर्जाचे प्रमाण ६४ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे. यावरील कर्जाचा विकासावर नकारात्मक परिणाम होतो. हेच श्रीलंकेच्या सध्याच्या चित्रात दिसून येत आहे.

कर्जाची आकडेवारी पाहता, अमेरिकेवर २३,९०० अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज आहे, जे त्याच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. ब्रिटनवर ७,३०० अब्ज डॉलर कर्ज आहे, जे त्यांच्या जीडीपीच्या अडीच पट जास्त आहे. फ्रान्सवरील परकीय कर्ज ६५०० अब्ज डॉलर आहे, तेही त्यांच्या जीडीपीच्या अडीच पट आहे. तर जीडीपीच्या तुलनेत भारताचे बाह्य कर्ज १९.९ आहे. गेल्या वर्षभरात कर्जामध्ये ४७ बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. हे कर्ज भारताच्या जीडीपीपेक्षा कमी आहे.

श्रीलंकेवर एकूण ५१ अब्ज डॉलर्सचे बाह्य कर्ज आहे. म्हणजेच श्रीलंकेवरील एकूण कर्ज, जेवढे कर्ज भारतावर गेल्या वर्षभरातच वाढले आहे. तथापि, या प्रकरणात काळजी करण्यासारखे काहीही नाही. खरं तर, जीडीपीच्या तुलनेत भारतावरील एकूण कर्ज तुलनेने कमी आहे. मार्च २०२०मध्ये भारताचे कर्ज आणि जीडीपी गुणोत्तर सुमारे २०.६ टक्के होते, जे मार्च २०२१ मध्ये २१.१ टक्के झाले. मार्च २०२२ मध्ये हे प्रमाण १९.९ टक्क्यांवर आले आहे. कर्जाचे जीडीपीचे प्रमाण जितके कमी असेल तितका देश कर्ज फेडण्यास सक्षम असेल. श्रीलंकेवर कर्जाचे प्रमाण खूप जास्त होते. २०१८ मध्ये, श्रीलंकेवर त्याच्या जीडीपीच्या ८० टक्क्यांहून अधिक कर्ज होते. २०२०मध्ये, तो १०१ टक्क्यांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता.

Srilanka Economic Crisis India Future Expert Says


Previous Post

खरेदी केली जुनी पर्स आणि महिलेची लागली चक्क लॉटरीच!

Next Post

नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मिळेल एवढे वेतन आणि हे सर्व लाभ

Next Post

नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मिळेल एवढे वेतन आणि हे सर्व लाभ

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

वृद्ध महिलेच्या पर्समधील एक लाख रुपयांवर डल्ला; द्वारकेच्या आयडीबीआय बँकेतील प्रकार

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group