नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवजात अर्भकापाठोपाठ प्रसुत २० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कामिनी दिपक सराटकर (२० रा. खैरे गल्ली,नवा दरवाजा) असे मृत महिलेचे नाव आहे. कामिनी सराटकर या गर्भवती महिलेस गेल्या २७ जुलै रोजी प्रसुत कळा सुरू झाल्याने तिला निवेदिता पवार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. दुस-या दिवशी प्रसुती दरम्यान तिने मृत बालकास जन्म दिला होता. प्रसूतीत अतिरक्तश्राव झाल्याने तिला मुंबई येथील लिलावती हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. मुंबई येथून तिला पुन्हा आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले असता ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत डॉ.महेंद्र गोंदके यांनी दिलेल्या खबरीवरून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत.