India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कडाक्याच्या थंडीमुळे हृदयविकाराचा धोका का वाढतो? या लक्षणांकडे जराही दुर्लक्ष करु नका

India Darpan by India Darpan
January 14, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कडाक्याच्या थंडीमुळे जालंधर येथील काँग्रेस खासदार संतोष चौधरी यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे काँग्रेसची भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. कडाक्याच्या थंडीचे मानवी आरोग्यावर काय परिणाम होतात याबद्दलही विशेष चर्चा सुरू झाली आहे. म्हणूनच आपण यासंदर्भात आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून जाणून घेऊया…

भारत जोडो यात्रेत खासदार संतोष चौधरी यांचे प्रवासादरम्यान हृदयाचे ठोके अचानक वाढले होते. हृदयरोगतज्ज्ञ सांगतात की, प्रत्येकाने हिवाळ्यात हृदयाच्या आरोग्याबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषत: ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा ज्यांना आधीच हृदयविकाराची समस्या आहे. अशा लोकांसाठी, तापमानातील घसरण ही एक गंभीर समस्या असू शकते.

थंडीमुळे शरीरातील उष्णता नैसर्गिकरित्या कमी होते, त्यामुळे तुम्हाला उबदार ठेवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते. थंडीमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे मेंदू आणि इतर प्रमुख अवयवांना रक्त पंप करण्यासाठी हृदयाला कठोर परिश्रम करावे लागतात, ही स्थिती हृदय गती वाढवू शकते. या स्थितीत हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

तज्ज्ञ सांगतात की, थंड वातावरणात आपले शरीर नैसर्गिकरित्या तापमान संतुलित करण्याचा प्रयत्न करते. शरीराचे सामान्य तापमान राखण्यासाठी हृदयाकडून अतिरिक्त प्रयत्न केल्यामुळे BMR (बेसल मेटाबॉलिक रेट) देखील वाढतो. बेसल मेटाबॉलिक रेट शरीरातील चयापचय मोजतो. याशिवाय हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याची समस्याही वाढते, त्यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव वाढण्याचा धोका असतो. अशा स्थितीकडे लक्ष न दिल्याने अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

ही असतात लक्षणे
आरोग्य तज्ञ म्हणतात की, हृदयविकाराची समस्या अचानक उद्भवते, जरी काही प्रकरणांमध्ये त्याची लक्षणे ओळखली जाऊ शकतात आणि आपत्कालीन वैद्यकीय उपचारांद्वारे वाचवता येतात. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुष आणि स्त्रियांमध्ये भिन्न असू शकतात. त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे. पुरुषांमध्ये, बहुतेक प्रकरणांमध्ये छातीत दुखते जे डाव्या हातापर्यंत पसरते. याशिवाय, स्नायूंचा ताण, अचानक हृदय गती वाढणे आणि घाम येणे अशी समस्या असू शकते. याउलट छातीत दाब, धाप लागणे, चक्कर येणे, घाम येणे, जबड्यात दुखणे यासारख्या समस्या महिलांमध्ये अधिक दिसून येतात.

थंडीत विशेष काळजी घ्या
आरोग्य क्षेत्रातील जाणकार सांगतात की, थंड हवामानात बचाव करण्याचा सल्ला सर्वांनाच दिला जातो. हृदयाची गुंतागुंत कमी करण्यासाठी, शरीर उबदार ठेवा, ज्यामुळे हृदयावरील अतिरिक्त दबाव कमी होतो. घरी नियमित व्यायाम करा, हृदय निरोगी ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. हिवाळ्यात सकस आहार घ्या. मधुमेह, रक्तदाब यांसारख्या स्थितींवर लक्ष ठेवा. त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना करत राहा. दारूचे सेवन टाळा. रक्तदाबाची औषधे वेळेवर घेत राहा, रक्तदाब नियमित तपासा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Winter Cold Heart Attack Chances Human Health Effect


Previous Post

कोल्हापूर ते बंगळुरू थेट विमानसेवा सुरू; अहमदाबाद, हैदराबादनंतर तिसरे शहर कनेक्ट

Next Post

येवल्यात पतंगोत्सवाला सुरुवात; नायलॉन मांजामुळे एक जण जखमी

Next Post

येवल्यात पतंगोत्सवाला सुरुवात; नायलॉन मांजामुळे एक जण जखमी

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group