मुंबई – गेल्या काही आठवड्यांपासून व्हॉट्सअॅप या इन्स्टट मॅसेजिंग अॅपबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. व्हॉट्सअॅपने अशात एकामागून एक नव्या फिचरचे अनावरण केले आहे. चॅटिंगची सुविधा अधिक चांगली व्हावी तसेच अॅप वापरणे सोयीचे व्हावे यासाठी युजर्सना पूर्वीपेक्षा चांगला अनुभव देण्याचा व्हॉट्सअॅपचा प्रयत्न आहे.
कंपनीने नुकतेच चॅट हिस्ट्रीला अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसदरम्यान ट्रान्सफर करण्यासाठी एका नव्या फिचरचे अनावरण केले. नवे फिचर कार्यान्वित करण्याच्या या साखळीत कंपनीने व्हॉट्सअॅपमध्ये शेअरिंगशी संबंधित एक महत्त्वाचे फिचर कार्यान्वित केले आहे.
अँड्राइड आणि आयओएस युजर्ससाठी
कंपनी आजकाल एका अशा फिचरवर काम करत आहे जे युजर्सना लिंक शेअर करताना थंबनेल इमेजचा मोठा प्रीव्ह्यू पाहण्याची सुविधा देणार असल्याचे वृत्त आले होते. या फिचरला अँड्रॉइड आणि आयओएस बिटा युजर्ससाठी सादर करणार आहे.
फिचरची माहिती
WABetalnfo या वेब पोर्टलने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, हे फिचर अँड्रॉइड बिटा व्हर्जन २.२१.१७.१५ आणि आयओएस बिटा व्हर्जन २.२.१.१६०.१७ साठी सादर केले आहे. या बिटा अपडेटला कंपनीकडून बॅचेसमध्ये कार्यान्वित करत आहे. आज रात्रीपर्यंत जवळपास सर्व युजर्सपर्यंत हे फिचर पोहोचून जाईल.
नंतर येणार स्टेबल व्हर्जन
बिटा युजर्सनी नवीन बिटा व्हर्जन अपडेट केले असेल तर तुम्ही आता लिंक शेअर करण्यापूर्वी इमेजचा मोठा प्रिव्ह्यू पाहू शकता. व्हॉट्सअॅपमध्ये लिंक शेअर करताना युजर्सना लहान थंबनेल दिसेल. या फिचरचे टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर जागतिक युजर्ससाठी स्टेबल व्हर्जन लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.