नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालाने कडक शब्दात झापल्यानंतर अखेर दिल्ली पोलिसांना जाग आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूंच्या तक्रारींची दखल अखेर घेण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
अल्पवयीन कुस्तीपटूचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांनी ब्रिजभूषण विरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याच वेळी, इतर सहा महिला कुस्तीपटूंच्या आरोपांवर दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिस या आरोपांची चौकशी करणार आहेत. डीसीपी प्रणव तायल यांनी याला दुजोरा दिला आहे.
शुक्रवारी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी WFI अध्यक्षाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची तयारी दर्शवली होती. २१ एप्रिल रोजी एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली होती. गुन्हा दाखल न झाल्याने कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. २३ एप्रिलपासून बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्यासह अनेक दिग्गज कुस्तीपटू जंतरमंतरवर बेमुदत संपावर बसले आहेत.
कुस्तीपटूंच्या पत्रकार परिषदेनंतर ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले – मी कायद्याचे पालन करेन, मी यापूर्वीही हेच करत आलो आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आहे, मी वाचू शकलेलो नाही. मी माझ्या निवासस्थानी आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. न्यायालयाने आज जो काही निर्णय घेतला आहे त्याचे मी स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आणि पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर माझा विश्वास आहे. तपासात माझे सहकार्य आवश्यक असेल तेथे मी सहकार्य करेन.
https://twitter.com/_prashantkadam/status/1652005470364901376?s=20
WFI President Brijbhushan 2 FIR Booked Delhi Police