India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विमानात प्रवासी आले… पण पायलटच गायब! तब्बल ८ तास चालला गोंधळ… नंतर काय झालं

India Darpan by India Darpan
April 29, 2023
in संमिश्र वार्ता
0
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विमानातील विचित्र घटना कायमच चर्चेत असतात. विशेषतः एअरलाईन्सच्या चुकांमुळे किंवा गोंधळलेल्या व्यवस्थापनामुळे घडणाऱ्या घटना तर विशेषत्वाने चर्चेत असतात. आता मात्र इंडियो कंपनीने कहरच केला. कंपनीच्या एका शेड्युल्ड फ्लाईटसाठी प्रवासी पोहोचले तरीही पायलटच गायब होता. त्यामुळे तब्बल ८ तास उशिराने टेक-ऑफ झाले.

२७ एप्रिलला रात्री ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाने (६ई-२५१८) आठ तासांनी उड्डाण केले. विशेष म्हणजे प्रवासी अगदी वेळेत एअरपोर्टला पोहोचले होते. चेक-इन झाले होते. पण, विमानात बोर्डींग झाले नव्हते. पहिले दोन तास तर प्रवासीच व्यवस्थापनाला उशीर होण्याचे कारण विचारत होते. मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने प्रवासी संतापले.

अखेर तीन तासांनंतर व्यवस्थापनाने खरे कारण सांगितले. त्यावेळी कळले की फ्लाईट रेडी असले तरीही पायलटच जागेवर नाही. पायलट गायब असल्यामुळे फ्लाईट टेक-ऑफ करणे शक्य नव्हते. अश्यात प्रवाशांचे हाल झाले. एकतर सुरुवातीला विमानासंदर्भात कुठलीही माहिती दिली गेली नाही. आणि त्यानंतर एवढ्या विचित्र कारणांनी ताटकळत बसावे लागले. त्यामुळे प्रवाश्यांनी इंडिगो व्यवस्थापनाला चांगलेच धारेवर धरले.

पहाटे उडाले विमान
प्रवाश्यांना ताटकळत राहावे लागल्याने व्यवस्थापनाने दिलगिरी व्यक्त केली. सर्व प्रवाश्यांची खानपानाची व्यवस्था करण्यात आली. आणि २८ एप्रिलला पहाटे ४ वाजता विमानाने टेक-ऑफ केले.

खरे कारण वेगळेच
मुळात मुंबईतच येताना खराब हवामानामुळे विमानाला उशीर झाला. त्यानंतर पुढील उड्डाणासाठी प्रशासकीय व्यवस्था आणि केबिन क्रुची व्यवस्था करणे यामुळे अधिकच विलंब झाला. त्यानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कंपनीने वेगवेगळ्या व्यवस्था केल्या.

Mumbai Airport Indigo Flight Chaos Passenger Pilot


Previous Post

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी कृषीमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा

Next Post

सुप्रीम कोर्टाने झापल्यानंतर अखेर ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध २ गुन्हे दाखल; खेळाडूंच्या लैंगिक छळाचे प्रकरण

Next Post

सुप्रीम कोर्टाने झापल्यानंतर अखेर ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध २ गुन्हे दाखल; खेळाडूंच्या लैंगिक छळाचे प्रकरण

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group